Bollywood Affairs : बोल्ड सीनमुळे तुटले या अभिनेत्याचे लग्न, आजही आहे अविवाहित!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:30 AM2019-06-23T06:30:00+5:302019-06-23T23:01:43+5:30
सुश्मिता सेन, नीतू चंद्रा, अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंग अशा अनेक अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडले गेले.
अभिनेता रणदीप हुड्डा याची वेगळी ओळख देण्याची गरज नाही. फार कमी वेळात त्याने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. मान्सून वेडिंग, सरबजीत ते लाल रंग यासारख्या अनेक चित्रपटातील त्याचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. २००१ मध्ये ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे रणदीपने आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. पण यानंतर सलग चार वर्षे रणदीपला कुणीही काम देईना. यानंतर २००५ मध्ये रामगोपाल वर्मा यांनी त्याला आपल्या ‘डी’ चित्रपटासाठी साइन केले आणि यानंतर रणदीपने कधीच मागे वळून पाहिले नाही. रणदीप आजही अविवाहित आहे. पण सुश्मिता सेन, नीतू चंद्रा, अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंग अशा अनेक अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडले गेले.
सुश्मिता सेनसोबतचे रणदीपचे लव्ह अफेअर चांगलेच गाजले होते. ‘कर्मा और होली’ नावाच्या एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात रणदीप व सुश्मिता या दोघांनी एकत्र काम केले होते. याचदरम्यान ते एकमेकांच्या जवळ आलेत.
रणदीप तेव्हा बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. तर सुश्मिता बी टाऊनची प्रस्थापित अभिनेत्री होती. पण ते एकमेकांच्या जवळ आलेत. त्यानंतर हे दोघे अनेकदा एकत्र दिसले. रणदीप हा सुश्मिताच्या आयुष्यात आलेला तिसरा बॉयफ्रेन्ड होता. पण इतर अफेअर्सप्रमाणे रणदीपबरोबरचे तिचे अफेअर्सही लवकरच संपले.
सुश्मिता सेननंतर रणदीप अभिनेत्री नीतू चंद्रासोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता, असे म्हणतात. त्याकाळात दोघेही सर्रास एकत्र फिरताना दिसत. हे रिलेशनशिप लग्नापर्यंत पोहोचले होते, असेही म्हटले जाते. मीडियाचे मानाल तर, रणदीप त्या काळात अनेक चित्रपटांत बोल्ड सीन्स देत होता.
मर्डर3, साहेब बीवी और गँगस्टर अशा अनेक चित्रपटांत त्याने बोल्ड सीन दिलेत. नीतूला हे मान्य नव्हते. रणदीपने ऑनस्क्रीन बोल्ड सीन देऊ नयेत, असे तिचे म्हणणे होते. नीतूने यासंदर्भात रणदीपशी अनेकदा चर्चा केली. पण रणदीप मानला नाही. त्याने बोल्ड सीन देणे सुरुच ठेवले. नीतूने ‘साहेब बीवी और गँगस्टर’ पाहिला तर त्यात रणदीप पुन्हा बोल्ड सीन देताना तिला दिसला. नीतू यामुळे प्रचंड खवळली. असे म्हणतात की, याचमुळे तिने रणदीपसोबत सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.