असह्य वेदना अन् १०२ ताप; अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला 'टिप टिप बरसा पानी' गाण्याच्या शूटिंगचा अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 11:19 AM2024-12-04T11:19:07+5:302024-12-04T11:23:28+5:30

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी तसेच रवीना टंडन यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली.

bollywood actress raveena tandon share experience about mohra film tip tip barsa paani song shooting  | असह्य वेदना अन् १०२ ताप; अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला 'टिप टिप बरसा पानी' गाण्याच्या शूटिंगचा अनुभव 

असह्य वेदना अन् १०२ ताप; अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला 'टिप टिप बरसा पानी' गाण्याच्या शूटिंगचा अनुभव 

Raveena Tandon : १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar), सुनील शेट्टी (Sunil Shetty) तसेच रवीना टंडन (Raveena Tandon) यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला. मोहरा मधील अक्षय कुमार, रवीना टंडन आणि सुनील शेट्टी यांचा जबरदस्त परफॉर्मन्सने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं. या चित्रपटाप्रमाणे त्याचं कथानक आणि त्यातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. 'टिप टिप बरसा पानी' आणि 'ना कजरे की धार' ही दोन गानी तेव्हा चांगलीच लोकप्रिय झाली. शिवाय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या गाण्याचे रिमेक झाले तरीही त्यावर थिरकायचा मोह कोणालाही आवरता येत नाही.

'टिप टिप बरसा पानी' या गाण्यातील अक्षयकुमार, रवीना टंडन यांची केमिस्ट्रीची सर्वत्र चर्चा झाली. विशेष म्हणजे या गाण्यामुळे रवीना टंडनला एक वेगळीच ओळख मिळाली. परंतु रविनाने  तापाने फणफणत असतानाही या गाण्याचं चित्रीकरण केलं. याचा किस्सा अभिनेत्रीने बऱ्याच मुलाखतींमध्ये केला आहे.

'पिंकविला' ला दिलेल्या मुलाखतीमध्येही रवीनाने याबाबत खुलासा केला होता. त्यादरम्यान मुलाखतीत अभिनेत्री रवीना टंडन म्हणाली, "टिप टिप बरसा पानी हे गाणं एका कन्स्ट्रक्शन साइटवर शूट केलं होतं. त्यावेळी शूटिंग करताना माझ्या पायात चप्पल सुद्धा नव्हती, त्यामुळे पायात खिळे टोचत होते. इतकंच नाही तर त्यावेळी माझे पिरियड्स सुरू होते आणि मला त्यामुळे असह्य वेदना सहन कराव्या लागल्या."

पुढे अभिनेत्री म्हणाली, "या गाण्याचं शूटिंग पावसात करण्यात आलं होतं. त्यामुळे थंड पाण्यात भिजल्यामुळे मला १०२ डिग्री ताप आला. असं असतानाही मी शूट थांबवलं नाही काम पूर्ण केलं. शिवाय कन्स्ट्रक्शन साइ़टवर पायात टोचलेल्या खिळ्यांमुळे मला टीटीची इंजेक्शन देखील घ्यावी लागली. त्यामुळे मी दोन दिवस बेड रेस्टवर होते." असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

Web Title: bollywood actress raveena tandon share experience about mohra film tip tip barsa paani song shooting 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.