अभिनयासाठी बॅंकेच्या नोकरीचा त्याग, बॉलिवूडची 'कूल मदर' श्रीदेवीलाही अभिनयात द्यायची टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 04:31 PM2024-06-21T16:31:00+5:302024-06-21T16:32:59+5:30
अभिनेत्री रिमा लागू यांच निधन होऊन आज बरीच वर्षे उलटली आहेत. वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून आजही त्या चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. आज रिमा लागू यांचा जन्मदिवस आहे.
Reema Lagoo Birth Anniversary : 'मैनें प्यार किया, हम आपके हैं कौन', 'रंगीला', 'जयकिशन', 'कल होना हो' तसेच 'कुछ कुछ होता हैं' यांसारखे सुपरहिट देणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू. अभिनेत्री रिमा लागू यांच निधन होऊन आज बरीच वर्षे उलटली आहेत. वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून आजही त्या चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. आज रिमा लागू यांचा जन्मदिवस आहे.
मीडिया रिपोर्टनूसार, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी रिमा लागू एका बॅंकेत नोकरी करत होत्या. नोकरी दरम्यान वेगवेगळ्या कल्चरल इव्हेंटमध्ये त्या सहभागी होत असतं. तिथेच त्यांच्या कलेला वाव मिळायचा. अशातच नोकरी करत असताना त्यांना एका टिव्ही सिरिअलमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे त्यांना बॅंकेची नोकरी सोडावी लागली.
१९८५ मध्ये आलेल्या 'खानदान' या एका टिव्ही सिरिअलच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांच लक्ष वेधलं. त्यानंतर 'श्रीमान-श्रीमती' आणि 'तू तू मैं मैं' अशा अनेक सिरिअल्समधून त्यांनी आपल्य अभिनयाची चमक दाखवली. स्टारर आमिर खान तसेच जुही चावला यांच्या 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या सिनेमात त्यांनी जूही चावलाच्या आईची भूमिका साकारली होती. त्यानंतर सलमान खानसोबत 'मैंने प्यार किया' मध्ये काम करत त्या प्रेक्षकांच्या नजरेत आल्या.
श्री देवीवरही भारी पडल्या होत्या रिमा लागू-
'गुमराह' या चित्रपटात दोन्ही अभिनेत्रींनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात श्रीदेवी लीड रोलमध्ये होत्या. तर, रिमा लागू यांनी श्रीदेवीच्या आईची भूमिका साकारली होती. परंतु, रिमा लागू यांचा जबरदस्त अभिनय पाहून श्रीदेवी इनसिक्युअर झाल्या होत्या. इतकंच नाही तर आपल्या लोकप्रियतेवर परिणाम होऊ नये यासाठी त्यांनी चक्क सिनेमातून रिमा लागू यांचे सीन कट करायला लावले होते. त्याकाळी श्रीदेवी टॉपची अभिनेत्री होत्या त्यामुळे चित्रपट दिग्दर्शकांनीही रिमा लागू यांचे सीन कट केले होते.
रिमा लागू यांच्या लोकप्रियतेचा परिणाम आपल्या करिअरवर होऊ नये यासाठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी दिग्दर्शकाला रिमा यांचे काही काही सीन त्यांच्या सिनेमातून हटवायला सांगितले होते.