पहिल्यांदाच विदाऊट मेकअप कॅमेरात कैद झाली रेखा; चेहऱ्यावर दिसल्या वाढत्या वयाच्या खुणा, पाहा तिचा No makeup look
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 17:17 IST2024-01-17T17:12:47+5:302024-01-17T17:17:07+5:30
Rekha: मेकअपशिवाय रेखा कशी दिसते माहितीये का? फोटो पाहून तुम्ही सुद्धा व्हाल थक्क

पहिल्यांदाच विदाऊट मेकअप कॅमेरात कैद झाली रेखा; चेहऱ्यावर दिसल्या वाढत्या वयाच्या खुणा, पाहा तिचा No makeup look
अभिनय कौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रेखा (rekha). या अभिनेत्रीची प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल आयुष्याची कायम चर्चा रंगली. किंबहुना आजही चर्चा रंगताना दिसते. यात खासकरुन तिचे प्रेमप्रकरणे विशेष गाजले. मात्र, यावेळी तिच्या कोणत्याही प्रेमप्रकरणाची चर्चा रंगली नसून तिच्या नो मेकअप लूकची चर्चा चर्चा रंगली आहे.
सौंदर्याची खाण, एव्हरग्रीन ब्युटी अशा कितीतरी विशेषणाने रेखाचा उल्लेख केला जातो. यात तिच्या कांजीवरम साड्या, त्यावर हेवी ज्युलरी, केसात गजरा आणि भांगेत सिंदूर हा तिचा लूक कायम चर्चेत असतो. विशेष म्हणजे तिच्या या लूकवर आजही अनेक जण फिदा आहेत. परंतु, कायम अप टू डेट राहणाऱ्या रेखाचा पहिल्यांदाच विदाऊट मेकअप लूक समोर आला आहे. विशेष म्हणजे मेकअपशिवाय रेखा प्रचंड वेगळी दिसते. त्यामुळे तिचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक जण थक्क झाले आहेत.
सोशल मीडियावर रेखाचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती तिच्या कारमध्ये बसली असून तिने मेकअप केलेला नाही. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणा स्पष्टपणे दिसून येत आहेत. तिचा हा फोटो समोर आल्यानंतर तो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. BollywoodCIA यांच्या युट्यूब चॅनेलवरही तिच्या नो मेकअप लूकचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रेखाने जराही मेकअप केलेला नाही. फक्त हलकीशी लिपस्टिक लावली आहे. रेखाने मेकअप न केल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा, चेहऱ्यावर डाग असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
दरम्यान, तिचा हा फोटो पाहिल्यावर सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिच्या या लूकवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. रेखा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल आयुष्यामुळे सगळ्यात जास्त चर्चेत राहिली. यात तिचं आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याची आजही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते.