लहानपणीच 'या' अभिनेत्रीने घेतली घरची जबाबदारी; बालकलाकार म्हणून केलं कलाविश्वात पदार्पण

By शर्वरी जोशी | Published: January 12, 2022 06:42 PM2022-01-12T18:42:09+5:302022-01-12T18:42:52+5:30

Rupali suri: उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी रुपाली आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, रुपालीच्या कुटुंबाने एकेकाळी मोठ्या आर्थिक संकटांना तोंड दिलं आहे.

bollywood actress rupali suri shares her childhood experience about family | लहानपणीच 'या' अभिनेत्रीने घेतली घरची जबाबदारी; बालकलाकार म्हणून केलं कलाविश्वात पदार्पण

लहानपणीच 'या' अभिनेत्रीने घेतली घरची जबाबदारी; बालकलाकार म्हणून केलं कलाविश्वात पदार्पण

googlenewsNext

कलाविश्वाविषयी प्रत्येकालाच कायम कुतूहल आणि आकर्षण असतं. यात खासकरुन येथील झगमगाट आणि सेलिब्रिटींची लक्झरी लाइफस्टाइल याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायम आतुर असतात. परंतु, आज कलाविश्वात नाव कमावणारे किंवा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अनेक कलाकारांनी खऱ्या आयुष्यात प्रचंड स्ट्रगल केला आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली सुरी (rupali suri). उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी रुपाली आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, रुपालीच्या कुटुंबाने एकेकाळी मोठ्या आर्थिक संकटांना तोंड दिलं आहे.  अलिकडेच 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिची कौटुंबिक माहिती दिली. तसंच बालकलाकार म्हणून तिचा कलाविश्वातील प्रवास कसा सुरु झाला हेदेखील सांगितलं.

" मी लहान असतांना माझ्या घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे बऱ्याचदा आर्थिक संकटांनाही सामोरं जावं लागायचं. याच काळात एका प्रोजेक्टमध्ये बालकलाकाराची भूमिकेसाठी एका लहान मुलीची गरज असल्याचं माझ्या आईच्या कानावर आलं. एकीकडे घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे या प्रोजेक्टमुळे घराला थोडासा हातभार लागेल या विचाराने माझी आई मला त्या प्रोजेक्टच्या सेटवर घेऊन गेली. माझ्यात लहानपणापासून अभिनय आणि नृत्याचे गुण होते. त्यामुळे माझं सिलेक्शनही झालं. तेव्हापासून मी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. पण, प्रत्येक वेळी माझी आई माझ्यासोबत असायची. कोणत्याही प्रसंगी तिने मला एकटीला सोडलं नाही, असं रुपाली म्हणाली.

पुढे ती म्हणते, या प्रोजेक्टनंतर मला बालकलाकार म्हणून अनेक प्रोजेक्ट्स मिळत गेले. १०वीत असतांना मला 'डॅडी समझा करो' (Daddy Samjha Karo) ही मालिका मिळाली. माझ्या कळत्या वयात मिळालेली ही माझी पहिली मालिका होती. त्यानंतर मग हळूहळू करत मी फॅशनच्या जगात पाय ठेवला आणि काही ब्युटी स्पर्धांमध्ये भाग घेतला. असं करत माझा हा प्रवास सुरु झाला आणि आता पुन्हा मी अभिनेत्री म्हणून माझा प्रवास नव्याने सुरु केला आहे."

दरम्यान, मॉडलिंग क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर रुपाली बॉलिवूडमध्ये तिचं स्थान निर्माण करत आहे. लवकरच ती ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांच्यासोबत एका शॉर्टफिल्ममध्ये झळकणार आहे. 

Web Title: bollywood actress rupali suri shares her childhood experience about family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.