सारा अली खानचंं सीक्रेट अफेअर! भाजपा नेत्याच्या मुलाला करतेय डेट? केदारनाथला झाले स्पॉट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 05:43 PM2024-10-31T17:43:37+5:302024-10-31T17:44:45+5:30
सारा अली खानचा बॉयफ्रेंड अभिनेता असून त्याचा प्रसिद्ध राजकीय कुटुंबाशी संबंध आहे (sara ali khan)
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. साराला आपण विविध सिनेमा, वेबसीरिजमधून अभिनय करताना पाहिलंय. सारा अनेकदा सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असते. सारा अली खान काही वर्षांपूर्वी कार्तिक आर्यनला डेट करत होती. परंतु नंतर मात्र दोघांचं ब्रेकअप झालं. गेले काही महिने तरी साराच्या रिलेशनशीपच्या बातम्या समोर आल्या नाहीत. परंतु अचानक एका व्यक्तीसोबत साराचं नाव जोडलं गेलंय. हा साराचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरलीय.
हा आहे साराचा नवीन बॉयफ्रेंड
रेडीट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो वेगाने व्हायरल झालाय. या फोटोत केदारनाथच्या परिसरात असलेल्या भीमशीलेवर सारा डोकं टेकवताना दिसतेय. यावेळी साराच्या शेजारी एक व्यक्ती दिसत असून सारा आणि तो दोघेही जोड्याने दर्शन घेताना दिसत आहेत. त्यामुळे हा व्यक्ती साराचा नवीन बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या व्यक्तीचं नाव आहे अर्जुन प्रताप बाजवा.
DATING? : Sara Ali Khan spotted with Arjun Pratap Bajwa, BJP leader's son, fueling romance speculation🤔#Glamsham#SaraAliKhan#Bollywood#bollywoodbeauty#popculture#BJP#IndianCinema@SaraAliKhan@SaraAliKhanFC@SaraAliKhanFC_pic.twitter.com/ieSRU5tbOd
— glamsham.com (@glamsham) October 31, 2024
अर्जुन प्रताप बाजला आहे तरी कोण?
अर्जुन प्रताप बाजवा हा सुप्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आहे. पंजाबमधील अनुभवी राजकीय नेते फतेह जंग सिंह बाजवा यांचा अर्जुन हा मुलगा आहे. फतेह सध्या पंजाबमधील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत. सारा आणि अर्जुन खरंच एकमेकांना डेट करत आहेत का? सारा आणि फतेह यांचं सीक्रेट अफेअर सुरु आहे का? असे प्रश्न साराच्या चाहत्यांना पडले आहेत. जोवर सारा स्वतः जाहीरपणे तिच्या रिलेशनशीपबद्दल सांगत नाही तोवर आपण फक्त अंदाजच बांधूू शकतो.