अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ, बिहारमध्ये तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 11:37 AM2024-10-09T11:37:16+5:302024-10-09T11:39:46+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

bollywood actress shilpa shetty troubles rise complaint filed in bihar what exactly is the case | अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ, बिहारमध्ये तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ, बिहारमध्ये तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. बिहारमधील मुजफ्फरपूर येथील सीजेएम कोर्टात अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. येत्या ११ नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. घडल्या प्रकारामुळे शिल्पा शेट्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 


एका ज्वेलरी शॉपच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी शिल्पा शेट्टी प्रमुख पाहूणी म्हणून उपस्थित होती. ७ ऑक्टोबला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, या कार्यक्रमस्थळी शिल्पा दाखल तिथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्याचा परिणाम असा वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. जवळपास कलमबाग चौकात दोन तास ट्रॅमिक जॅम झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. शिवाय या कार्यक्रमा दरम्यान सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातंय. 

या सगळ्या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास झाला. शिल्पा शेट्टीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. त्यामुळे अधिवक्ता सुधीर कुमार ओझा यांनी अभिनेत्रीसह अन्य ४ जणांवर तक्रार दाखल केली आहे. 

Web Title: bollywood actress shilpa shetty troubles rise complaint filed in bihar what exactly is the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.