'छैय्या छैय्या'साठी मलायकाच्या जागी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला होती ऑफर; पण ठेवली होती 'ही' अट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 05:07 PM2024-12-09T17:07:47+5:302024-12-09T17:11:19+5:30
'छैय्या छैय्या' साठी मलायका नाही शिल्पा शिरोडकर होती फराह खानची पहिली पसंती; रिप्लेस होण्यामागचं 'हे' होतं कारण...
Shilpa Shirodkar: 'बिग बॉस मराठी' नंतर आता मनोरंजनविश्वात 'बिग बॉस १८' च्या नव्या सीझनची हवा पाहायला मिळते आहे. दरम्यान, यंदाच्या सीझनमध्ये एक मराठमोळा चेहरा देखील सहभागी झाला आहे. ९० च्या दशकातील 'सेन्शेशनल क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकरही (Shilpa Shirodkar) या शोमध्ये सहभागी झाली आहे. दरम्यान, अलिकडेच या सीझनच्या 'विकेंड वार'मध्ये सलमानच्या जागी फराह खानने हजेरी लावली. त्यावेळी फराहने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. यावेळी अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने एक किस्सा सांगितला. त्याच दरम्यान तिने 'छैय्या छैय्या गाण्यासाठी मलायका अरोराला (Malaika Arora) नाही तर तिला पहिल्यांदा ऑफर आली होती. पण, काही कारणामुळे तिला रिजेक्ट करण्यात आलं, असा खुलासा केला.
शाहरुख खानच्या 'दिल से' या सिनेमातील 'छैय्या छैय्या' हे गाणं त्या काळी प्रचंड गाजलं होतं. इतकंच नाही तर आज सुद्धा ते लोकप्रिय आहे. या गाण्यात शाहरुखसोबत अभिनेत्री मलायका अरोरा झळकली आहे. मात्र, या गाण्याची पहिली ऑफर शिल्पा शिरोडकरला मिळाली होती.
रविवारी झालेल्या विकेंड वार मध्ये 'छैय्या छैय्या' गाण्याबद्दल शिल्पाने तिच्या सहस्पर्धकांना एक किस्सा सांगितला. याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. त्यादरम्यान अभिनेत्री म्हणाली, "छैय्या छैय्या गाण्यासाठी फराह खानने मला कॉल केला होता. त्यावेळी फराहने मला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. पण, तेव्हा मी थोडी जाड होते आणि त्यांना ते गाणं लवकरात लवकर शूट करायचं होतं. त्यासाठी फरहाने मला १० दिवसांचा अवधी दिला होता."
पुढे अभिनेत्री म्हणाली, "त्यानंतर फराहने या गाण्यासाठी मलायकाला कास्ट केलं. जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं, असं मला वाटतं. मी ते गाणं केलं नाही पण त्यानंतर मला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या." असं अभिनेत्रीने सांगितलं.