ना कोणतीही पार्टी किंवा परदेशी टूर; श्रद्धा कपूरने असं केलं नवीन वर्ष २०२५ चंं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:13 IST2025-01-02T14:12:13+5:302025-01-02T14:13:23+5:30
श्रद्धा कपूरने नवीन वर्षाची खास सुरुवात करुन सर्वांसाठी एक आदर्श वस्तुपाठ ठेवलाय (shraddha kapoor)

ना कोणतीही पार्टी किंवा परदेशी टूर; श्रद्धा कपूरने असं केलं नवीन वर्ष २०२५ चंं स्वागत
बॉलिवूडमध्ये २०२४ मध्ये गाजलेली अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धाला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. २०२४ मध्ये श्रद्धाने 'स्त्री २' सिनेमात काम करुन बॉलिवूडमध्ये २०२४ मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा दिला. श्रद्धाचं रिअल लाइफमध्ये राहणीमान किती साधंसुधं आहे याचा अनुभव अनेकवेळा आलाय. एकीकडे बॉलिवूड सेलिब्रिटी नवीन वर्ष २०२५ चं स्वागत करण्यासाठी जंगी पार्टी अन् परदेशी टूर करताना दिसतात. पण श्रद्धाने मात्र खास पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केलेलं दिसलं
श्रद्धाने असं केलं २०२५ चं स्वागत
नवीन वर्षाची सुरुवात श्रद्धाने कशी केली याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. श्रद्धा रोजच्यासारखी जिममध्ये गेली. तिने भिजवलेले ड्रायफ्रूट्स आणि ब्लूबेरीचा आस्वाद घेतला. पुढे तिने तिच्या कुत्र्यांसोबत थोडा फेरफटका मारला. त्यानंतर कुटुंबासोबत वेळ घालवला. अशाप्रकारे रोजच्यासारखीच साधी तरीही हेल्दी सुरुवात करुन श्रद्धाने नवीन वर्ष २०२५ चं स्वागत केलं. २०२५ ची एकदम परफेक्ट सुरुवात असं कॅप्शन श्रद्धाने या फोटोला दिलं.
श्रद्धा कपूरचं वर्कफ्रंट
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २०२४ मध्ये श्रद्धाने 'स्त्री २' या सिनेमातून सर्वांचं मन जिंकलं. हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले. 'स्त्री २' नंतर श्रद्धा कोणत्या नवीन सिनेमात झळकणार याची सर्वांना उत्सुकता आहे. श्रद्धाच्या नवीन सिनेमाबाबत अजूनतरी कोणतंही अपडेट समोर नाही. श्रद्धा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. श्रद्धाने नवीन वर्षाची अशी खास सुरुवात केल्याने सर्वांसाठी एक आदर्श घालून दिलाय.