ना ऐश्वर्या, ना कतरिना! 'धूम ४' मध्ये रणबीर कपूरसोबत झळकणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 12:00 IST2024-10-15T12:00:04+5:302024-10-15T12:00:23+5:30
'धूम ४' मध्ये सध्याच्या सिनेमांतली आघाडीची अभिनेत्री झळकणार आहे (dhoom 4)

ना ऐश्वर्या, ना कतरिना! 'धूम ४' मध्ये रणबीर कपूरसोबत झळकणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री
'धूम' सिनेमाचं स्वतःचं एक फॅन फॉलोईंग आहे. 'धूम'च्या आजवरच्या तीनही भागांना प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं. 'धूम'च्या तिसऱ्या भागानंतर 'धूम'चा चौथा भाग अर्थात 'धूम ४' ची उत्सुकता शिगेला आहे. 'धूम ४'मध्ये खलनायक म्हणून रणबीर कपूर यावेळी दिसणार यावर शिक्कामोर्तब झालंंय. आता रणबीरसोबत हिरोईन कोण असणार याची उत्सुकता शिगेला होती. तर याचाही खुलासा झाला असून सध्याच्या मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री रणबीरसोबत झळकणार असल्याची चर्चा आहे.
या अभिनेत्रीची 'धूम ४'मध्ये वर्णी
मीडिया रिपोर्टस् नुसार 'धूम ४'मध्ये सध्याची चर्चेतली लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे 'धूम ४'मध्ये श्रद्धा रणबीरची हिरोईन म्हणून श्रद्धा कपूर दिसण्याची दाट शक्यता आहे. श्रद्धा आणि रणबीरने याआधी 'तू झूठी में मक्कार' सिनेमात अभिनय केला होता. दोघांची जोडी लोकांच्या पसंतीस उतरली. सध्या श्रद्धा 'स्त्री २' मुळे चर्चेत आहे. तर रणबीर 'अॅनिमल', 'रामायण' अशा सिनेमांमुळे प्रसिद्धीझोतात आहे. त्यामुळे 'धूम ४'मध्ये रणबीर-श्रद्धाला एकत्र पाहण्यास त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील यात शंका नाही.
'धूम ४'विषयी आणखी काही
काही दिवसांपूर्वी सूत्रांनी बॉलिवूड हंगामाला सांगितले की, विजय कृष्ण आचार्य यांनी 'धूम ४'ची स्क्रिप्ट लिहिली आहे. त्यांनी 'धूम' फ्रँचायझीचे शेवटचे तीन चित्रपट लिहिले आहेत आणि एका चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. याच कारणामुळे आता या पुढच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. त्यांनी 'धूम ३' दिग्दर्शित केला, जो त्यावेळी सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक ठरला. त्यामुळे 'धूम ४'चं दिग्दर्शनही विजय कृष्णा आचार्य करणार असल्याची शक्यता आहे.