या अभिनेत्रीचे वर्षभरापूर्वी झाले लग्न, आता घटस्फोटासाठी केला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 10:05 IST2020-01-21T10:05:28+5:302020-01-21T10:05:36+5:30
वर्षभरापूर्वी गुपचूप लग्नगाठ बांधून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणा-या या अभिनेत्रीने लग्न अखेर मोडले.

या अभिनेत्रीचे वर्षभरापूर्वी झाले लग्न, आता घटस्फोटासाठी केला अर्ज
वर्षभरापूर्वी गुपचूप लग्नगाठ बांधून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणा-या या अभिनेत्रीने लग्न अखेर मोडले. होय, अभिनेत्री श्वेता बासू प्रसादने काही दिवसांपूर्वी पतीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. आता श्वेताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत श्वेताने पती रोहित मित्तलपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. ‘रोहित मित्तल आणि मी दोघांनीही परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक महिन्यानंतर एकमेकांच्या भल्यासाठी आम्ही या निर्णयाप्रत पोहोचलो आहोत. सर्व पुस्तके केवळ मुखपृष्ठावरून वाचावीत, अशी नसतात. याचा अर्थ हा नाही की, ती पुस्तक वाईट असतात. पण काही गोष्टी अर्धवट सोडलेल्याच ब-या. मला इतके यादगार क्षण दिल्याबद्दल रोहित तुझे आभार. तुझे भावी आयुष्य आनंददायी होवो, तुझीच चिअरलीडर’,असे तिने लिहिले होते.
आता श्वेताच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु झाली आहे. श्वेताने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला. कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया सुरु झाली आहे. यानंतर आम्ही कायदेशीररित्या विभक्त होऊ. अर्थात घटस्फोटानंतरही आम्ही चांगले मित्र बनून राहू, असे श्वेताने मीडियाशी बोलताना सांगितले.
रोहित व श्वेता यांची लव्हस्टोरी पाच वर्षांपूर्वी सुरु झाली होती. ‘फँटम’चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. लग्नाआधी दोन वर्षे ते लिव्ह इनमध्ये राहिले. 2017 मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि 2018 मध्ये लग्न. 13 डिसेंबर 2018 रोजी श्वेताने निर्माता रोहित मित्तलसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली होती. पुण्याच्या एका पंचतारांकित हॉटेलात बंगाली पद्धतीने विवाहसोहळा झाला होता. या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. यानंतर काहीच महिन्यांपूर्वी दोघांच्या रोमॅन्टिक व्हॅकेशनचे फोटोही असेच व्हायरल झाले होते.
श्वेताने ‘मकडी’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. यानंतर ती अनेक चित्रपटांत झळकली. अलीकडे रिलीज झालेल्या ‘द ताश्कंद फाईल्स’ या चित्रपटात श्वेता दिसली होती. याशिवाय मर्द को दर्द नहीं होता, बद्री की दुल्हनिया या चित्रपटातही ती महत्त्वपूर्णभूमिकेत होती.
2014 मध्ये श्वेताचे नाव एका सेक्स स्कँडलमध्ये आले होते. तिला हैदराबादमध्ये एका रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर तिला हैदराबाद सेशन कोर्टाने क्लीन चीट दिली होती.