सुशांतला मरेपर्यंत ड्रग दिले गेले! बॉलिवूड अभिनेत्रीची पोस्ट, म्हणते- "नरेंद्र मोदी तुम्ही गप्प का?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 09:18 IST2025-03-24T09:17:39+5:302025-03-24T09:18:06+5:30
"रियाला रात्री झोप कशी लागते?", सुशांत राजपूत प्रकरणात क्लीन चीट दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीची पोस्ट

सुशांतला मरेपर्यंत ड्रग दिले गेले! बॉलिवूड अभिनेत्रीची पोस्ट, म्हणते- "नरेंद्र मोदी तुम्ही गप्प का?"
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने लॉकडाऊनमध्ये २१ जून २०२० रोजी मुंबईतील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. बेडरुममध्ये त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती आणि चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाल्याचं कुटुंबीयाचं म्हणणं होतं आणि त्याच्या मृत्यूची चौकशी सुरू होती. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली होती. शनिवारी सीबीयाने या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट देत सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाल्याचं सांगत रियालाही क्लीन चीट दिली. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन सुशांतचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने बॉलिवूडला सुनावत न्यायव्यवस्था आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
सोमी अलीची पोस्ट
"हे आहे बॉलिवूड...सगळे खान, न्यायव्यवस्था, तुमचं सरकार आणि कलाकार सगळ्यांना माहीत आहे की सुशांतला मारहाण करत त्याला मरेपर्यंत ड्रग दिले गेले. आणि त्याला आत्महत्या मानलं गेलं. जेव्हा गोष्ट अंडरवर्ल्डची असते तेव्हा ते सगळे गप्प बसतात. ९०च्या दशकात मी याचा सामना केला आहे. जे काही घडलं ते मी पाहिलं आहे आणि माझ्या एका मित्राला आत्महत्येमुळे गमावलं आहे. आता जेव्हा शवविच्छेदन करणारी व्यक्तीच हे सांगत आहे की त्याने आत्महत्या केली नव्हती. तरीदेखील त्यावर प्रश्न विचारण्याची कोणाची हिंमत नाही. वाह, काय जग आहे...काय माणुसकी आहे. म्हणजे नरेंद्र मोदीही गप्प आहेत. तुम्ही जेन Z पुढे चांगलं उदाहरण ठेवत आहात. मर्डरला आत्महत्या सांगत आहेत. आता पुढेही हेच सुरू राहणार आहे. शाहरुख आणि आमिर तुमच्याकडून मी काहीतरी अपेक्षा ठेवली होती", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अमिताभ बच्चन यांनाही विचारला प्रश्न!
"फिल्म इंडस्ट्री, न्यायव्यवस्था, पंतप्रधान, अंबानी, सहकलाकार, रिया चक्रवर्ती यांना रात्री झोप कशी काय लागते? मी सुशांतला कधीच भेटले नाही. तरीदेखील माझं रक्त खवळतं आहे. अमिताभ बच्चन सर तुम्ही कोणाला घाबरत आहात. दाऊदचा या घटनेशी काही संबंध नाही आणि तो शेवटच्या घटका मोजत आहे. मग कशाची भीती आहे? कोणी काहीच का बोलत नाहीये? तुमची विवेकबुद्धी कुठे गेली? न्यायव्यवस्थेत काय बिघडलं आहे? मला यावर विश्वास बसत नाहीये. एकही जण बोलायला तयार नाही. आणि ती भ्रष्ट प्रेयसीलाही क्लीन चीट मिळाली. हे समजण्यापलीकडे आहे".