सोनाक्षी सिन्हाची पती जहीर इक्बालच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणते- "तुझ्याशी लग्न केल्याचा मला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 06:38 PM2024-12-10T18:38:08+5:302024-12-10T18:41:49+5:30
बॉलिवूडची 'दबंग गर्ल' अभिनेत्री सोनाली सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इक्बाल हे कपल कायमच चर्चेत येत असतं.
Sonakshi Sinha : बॉलिवूडची 'दबंग गर्ल' अभिनेत्री सोनाली सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इक्बाल हे कपल कायमच चर्चेत येत असतं. सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी २३ जून २०२४ रोजी लग्न केलं. दोघांनी नोंदणी पद्धतीने सोनाक्षीच्या घरी लग्नगाठ बांधली. त्याचबरोबर सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला तिचे आई-वडील, झहीरचे पालक व त्याची भावंड आणि काही जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. दरम्यान, या जोडीबद्दल जाणून घेण्यास नेटकरीही उत्सुक असतात. सोनाक्षी आणि जहीर सोशल मीडियावर नेहमीच दोघेही एकमेंकावरचं प्रेम व्यक्त करण्याची कुठलही संधी सोडत नाहीत. दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असल्याचं दिसतं. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा आणि जहीर दिसत असतात. अशातच आज लाडक्या नवरोबाच्या वाढदिवशी अभिनेत्रीने सोशल मीडियावर दोघांचे खास फोटो शेअर करत जहीरला शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनाक्षी आणि जहीरचं लग्न होऊन जवळपास ६ महिने झाले आहेत. हे कपल त्यांचं सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. ते दोघे अधूनमधून पार्ट्यांनाही हजेरी लावताना दिसतात. दरम्यान, आज १० डिसेंबरच्या दिवशी जहीर इक्बालच्या वाढदिवशी सोनाक्षीने सोशल मीडियावर त्यांचे रोमॅंटिक फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत हटके अंजदाजात पती जहीरला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर सोनाक्षीने जहीरसोबतचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय की, "तुझ्या जन्मामुळे, तुझ्या आईनंतर मी सर्वात आनंदी आहे. तुझ्याशी लग्न केल्याचा मला त्याहूनही जास्त आनंद वाटतो. हॅप्पी बर्थडे माय बेस्ट बॉय! लव्ह यू..." सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोंवर जहीरने "आय लव्ह यू मोअर"अशी प्रतिक्रिया दिली आहे.