ब्लॅक ड्रेसकोड, हटके सेलिब्रेशन; सोनाक्षी-जहीरच्या बॅचलर पार्टीची सोशल मीडियावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 04:44 PM2024-06-18T16:44:32+5:302024-06-18T16:54:00+5:30
फिल्मी जगतात बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत.
Sonakshi- Zahir Wedding : फिल्मी जगतात बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. येत्या २३ जून रोजी सोनाक्षी बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या लग्नाला अवघे ५ दिवस उरले आहेत. अशातच सोनाक्षी आणि जहीरचे सोशल मीडियावर बॅचलर पार्टीचे फोटोज तुफान व्हायरल होत आहेत.
सोनाक्षीने आपल्या खास मैत्रीणींसोबत काल रात्री बॅचरल पार्टीचा आनंद लूटला. सोमवारी अभिनेत्रीने आपली जवळची मैत्रीण हुमा कुरेशीसह तिच्या गर्ल स्क्वॉडसोबत बॅचलर पार्टी एन्जॉय केली. शिवाय जहीरनेही त्याच्या बॉईज पलटनसोबत पार्टी करतानाचे क्षण इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेत.
या पार्टीमध्ये सोनाक्षीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ब्लॅक शिमरी आऊटफिटमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसतेय. एवढंच नाही या पार्टीमध्ये सोनाक्षीसह तिचा गर्ल गॅंग देखील काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसते आहे. या बॅचलर पार्टीचा ड्रेस कोड ब्लॅक असल्याचा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे जहीरची बहिण सनम रतनसीनही या पार्टीत हजर होती. वेगवेगळ्या पोज देत भावी वधूने तिच्या मैत्रीणींसोबत असा टाईम स्पेंड केला आहे.
त्यातच सोनाक्षीच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच जहीरनेही आपल्या एका मित्राच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करत त्यांचे पार्टीचे फोटो रिपोस्ट केले आहेत. चलो चले! असं लक्षवेधी कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. त्याचबरोबर फिल्म एटिडर माहिर जवेरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर "बेबी की शादी हो रही हैं", अशी हिंट देत जहीरसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
मीडिया रिपोर्टनूसार, सोनाक्षी आणि जहीरने २३ जून या दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय सोनाक्षी आणि जहीर यांच लग्न मुंबईत होणार असल्याने त्यांच्या लग्नासाठी चाहतेही उत्सुक असल्याचं चित्र आहे.