४४ वर्ष जुनी आईची साडी अन् खड्यांचा नेकलेस; सोनाक्षीच्या लग्नातील साधेपणाची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 02:00 PM2024-06-24T14:00:11+5:302024-06-24T14:04:03+5:30

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा प्रियकर जहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकली आहे.

bollywood actress sonakshi sinha and zaheer iqbal wedding look actress wear mother poonam sinha 44 years old chikankari saree and kundan jewellery | ४४ वर्ष जुनी आईची साडी अन् खड्यांचा नेकलेस; सोनाक्षीच्या लग्नातील साधेपणाची होतेय चर्चा

४४ वर्ष जुनी आईची साडी अन् खड्यांचा नेकलेस; सोनाक्षीच्या लग्नातील साधेपणाची होतेय चर्चा

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding : बॉलिवूडची 'दबंग गर्ल' अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा प्रियकर जहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकली आहे. २३ जूनला या दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्नगाठ बांधली. सध्या सोशल मीडियावर या नवविवाहित जोडप्याबद्दल तुफान चर्चा रंगताना दिसतेय. त्याचं कारणही तितकंच खास आहे. जवळपास ७ वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत होते. अखेर कुटुंबियांच्या समवेत स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट अंतर्गत सोनाक्षी-जहीरने लग्न केलं.

सोनाक्षीने परिधान केली ४४ वर्ष जुनी साडी-

आपल्या आयुष्यातील या अविस्मरणीय प्रसंगी नववधू सोनाक्षीने परिधान केलेल्या साडीने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्रीला ब्रायडल लूकमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते फारच उत्सुक होते. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या लग्नामध्ये पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. पण खास गोष्ट म्हणजे  ही साडी तिची आई पूनम सिन्हा यांची होती. ४४ वर्षांपूर्वी पूनम सिन्हा यांनी आपल्या लग्नामध्ये जी साडी नेसली होती ती साडी सोनाक्षीने तिच्या लग्नामध्ये नेसली. जहीरनेही तिच्या आउटफिटला मॅचिंग कुर्ता पायजमा परिधान केला होता. 

हेअरस्टाईलने वेधलं लक्ष-

साधा मेकअप तसेच केसांचा अंबाडा करून त्यावर मोगऱ्याचा गजरा सोनाक्षीने घातला होता. ब्राइडल लूकमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते आहे.

सोनाक्षीने आपला लूक पूर्ण करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही. पांढरी साडी त्यावर साजेसा कुंदन चोकर नेकलेस तसेच हातात बांगड्या तिने घातल्या होत्या. चिकनकारी कुर्ता परिधान करून जहीरही त्यात कमाल दिसत होता. या नवीन कपलचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

७ वर्षापासून एकमेकांना डेट करत होते-

मीडिया रिपोर्टनुसार, सोनाक्षी आणि जहीर हे दोघे एकमेकांना जवळपास ७ वर्षापासून डेट करत होते. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट केलेत. त्यावर कॅप्शन देत तिने म्हटलंय, "आजच्या दिवशी (२३.०६.२०१७) आमच्या प्रेमकहणीला सुरुवात झाली होती आणि त्याच दिवशी आम्ही लग्नबंधनात अडकत आहोत." 

Web Title: bollywood actress sonakshi sinha and zaheer iqbal wedding look actress wear mother poonam sinha 44 years old chikankari saree and kundan jewellery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.