VIDEO: पती जहीर इक्बालच्या 'या' सवयींना कंटाळली सोनाक्षी सिन्हा; म्हणते- "जेव्हापासून याला भेटले..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 11:10 IST2024-12-30T11:06:51+5:302024-12-30T11:10:09+5:30
रोडट्रीपवर गेले असताना जहीर इक्बालने सोनाक्षीसोबत केला मजेशीर प्रॅंक, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणते...

VIDEO: पती जहीर इक्बालच्या 'या' सवयींना कंटाळली सोनाक्षी सिन्हा; म्हणते- "जेव्हापासून याला भेटले..."
Sonakshi Sinha :बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा Sonakshi Sinhaआणि तिचा पती जहीर इक्बाल कायमच चर्चेत येत असतात. सोनाक्षी सध्या अभिनयातून ब्रेक घेत तिचं वैवाहिक आयुष्यात व्यस्त असल्याची पाहायला मिळतेय. लग्नानंतर हे जोडपं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. दरम्यान, सोनाक्षी-जहीर न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी परदेशात गेले आहेत. त्याचे अपडेट्सही अभिनेत्री आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असल्याची पाहायला मिळतेय. अशातच नुकताच सोनाक्षीने सोशल मीडियावर त्या दोघांचा एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दिसतंय की, सोनाक्षी-जहीर फिरायला गेले असताना अभिनेत्री थकल्यामुळे थोडी विश्रांती घेताना दिसतेय. त्यावेळी तिचा नवरा झहीर इक्बाल म्हणतो, माझ्या बायकोसोबत मी रोड ट्रीप करतो आहे. त्यानंतर तो अचानक जोरात मोठ्याने ओरडतो. त्यामुळे सोनाक्षी घाबरुन झोपेतून जागी होते आणि जहीरला मारु लागते. दरम्यान, सोनाक्षी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "जेव्हापासून याला भेटलेय, माझी झोप उडाली आहे."
सोनाक्षी आणि जहीर सोशल मीडियावर नेहमीच दोघेही एकमेंकावरचं प्रेम व्यक्त करण्याची कुठलही संधी सोडत नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सोनाक्षी आणि जहीरचं लग्न होऊन जवळपास ६ महिने झाले आहेत. दरम्यान, हे कपल त्यांचं सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे.