सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला ६ महिने पूर्ण! अभिनेत्रीने नवऱ्यासाठी शेअर केली रोमॅंटिक पोस्ट, म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 10:34 IST2024-12-24T10:31:20+5:302024-12-24T10:34:30+5:30

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल हे कपल सतत चर्चेत येत असतं.

bollywood actress sonakshi sinha share romantic picture with husband zaheer iqbal on their 6 month wedding anniversary netizens react | सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला ६ महिने पूर्ण! अभिनेत्रीने नवऱ्यासाठी शेअर केली रोमॅंटिक पोस्ट, म्हणते...

सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला ६ महिने पूर्ण! अभिनेत्रीने नवऱ्यासाठी शेअर केली रोमॅंटिक पोस्ट, म्हणते...

Sonakshi Sinha On 6thMonth Wedding Anniversary: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इक्बाल हे कपल सतत चर्चेत येत असतं. अगदी काही महिन्यांपूर्वीच त्यांनी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरूवात केली. २३ जून २०२४ या दिवशी सोनाक्षी-जहीरने नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर मुंबईमध्ये रिसेप्शनचं आयोजन करीत बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना त्यांनी आमंत्रित केलं होतं. त्यांच्या लग्नाची मनोरंजनविश्वात चांगलीच चर्चा झाली. नुकतीच सोनाक्षी-जहीरच्या सुखी संसाराला ६ महिने पूर्ण झाले आहेत. याचनिमित्ताने सोनाक्षी सिन्हाने लाडक्या नवरोबासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. 

 

काल २३ डिसेंबरच्या दिवशी सोनाक्षीने त्यांच्या लग्नाला ६ महिने पूर्ण होताच सेलिब्रेशन केलं. शिवाय सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचे रोमॅंटिक फोटो पोस्ट केल्याचे पाहायला मिळाले. या फोटोंसोबत तिने कॅप्शन देत लिहिलंय की, "हॅप्पी सिक्स मंथ, जान..." त्यासोबत हार्ट इमोजी देखील तिने पोस्ट केला आहे. 

सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सोनाक्षी सिन्हा अखेरची संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसिरीजमध्ये फरीदानची भूमिका साकारताना दिसली होती. आता लवकरच सोनाक्षी-जहीर 'तू है मेरी किरण' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा एक रोमॅंटिक थ्रिलर असून करण रावल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.  

Web Title: bollywood actress sonakshi sinha share romantic picture with husband zaheer iqbal on their 6 month wedding anniversary netizens react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.