'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हाच्या नव्या सिनेमाची चर्चा; पहिलं पोस्टर आलं समोर, कधी होणार रिलीज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:44 IST2025-04-19T16:39:08+5:302025-04-19T16:44:32+5:30
बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला (Sonakshi Sinha) ओळखलं जातं.

'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हाच्या नव्या सिनेमाची चर्चा; पहिलं पोस्टर आलं समोर, कधी होणार रिलीज?
Sonakshi Sinha: बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला (Sonakshi Sinha) ओळखलं जातं. 'राऊडी राठोड', 'दबंग', 'सन ऑफ सरदार' यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता लवकरच ती नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निकीता रॉय असं तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. या पोस्टरमधील अभिनेत्रीचा लूक पाहून चाहत्यांच्या मनात चित्रपटाबद्ल उत्सुकता निर्माण झाली आहे.
नुकतीच सोनाक्षी सिन्हाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्रीने नव्या चित्रपटाची घोषणा केल्याची पाहायला मिळतेय. या साइकोलॉजिकल थ्रिलर सिनेमात सोनाक्षी सिन्हासह अभिनेते परेश रावल आणि अर्जुन रामपाल, सुहैल नय्यर देखील प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सर्व पात्रे सस्पेन्स लूकमध्ये दिसत आहेत. दरम्यान, या चित्रपटात सोनाक्षीचा कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळणार आहे.
कुश एस सिन्हा यांनी 'निकिता रॉय' हा चित्रपट दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.शिवाय या चित्रपटाची निर्मिती निक्की खेमचंद भगनानी, किंजल आहुजा घोन आणि विकी भगनानी यांनी केली आहे. हा चित्रपट ३० मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.