कंडोम 'विकताना' दिसली बॉलिवूडची ही अभिनेत्री, ट्रोल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 11:22 AM2022-05-05T11:22:53+5:302022-05-05T11:23:58+5:30
बॉलिवूडची ही अभिनेत्री कंडोम विकताना आणि त्याबद्दल जनजागृती करताना दिसते आहे.
बॉलिवूड अभिनेत्री नुशरत भरूचा (Nushrratt Bharuccha)ला आगामी चित्रपटामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. या चित्रपटाचे नाव आहे जनहित में जारी (Janhit Mein Jaari). हा चित्रपट कंडोमबद्दल जनजागृती करणारा आहे. या चित्रपटात नुसरत भरुचा सेल्सगर्लची भूमिका साकारली आहे. जी कंडोम विकते आणि त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करते. विषय बोल्ड असला तरी हा चित्रपट मजेशीर आहे.
जनहित में जारी हा चित्रपट १० जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे. जेव्हापासून या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहे. कंडोमला प्रमोट करणाऱ्या नुशरतला वाईटरित्या ट्रोल केले जात आहे. मात्र नुशरतदेखील ट्रोलर्सला चांगलेच प्रत्युत्तर देताना दिसते आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीने टीका करणाऱ्यांचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांना खडेबोल लगावले आहेत.
स्क्रीनशॉट्स शेअर करत नुशरतने म्हटले की, बस हेच विचार बदलायचे आहे. हेच तर मी सांगते आहे. तुम्ही बोला, मी तुम्हाला उत्तर देते. नुसरतने चित्रपटाचे पोस्टर्स शेअर केले आहेत, ज्यावर लोक अश्लील कमेंट्स करत आहेत. कोणी हा चित्रपट डी ग्रेड सांगत आहे. तर कोणाचे म्हणणे आहे की, बॉलिवूड मेडिकल स्टोअर बनले आहे. युजर्सचे म्हणणे आहे की, चित्रपटाची कथा खरी नाही कारण कोणती मुलगी बाजारात जाऊन अशी कंडोम विकत नाही.
काही लोकांनी चित्रपटाची प्रशंसा केली आहे. चित्रपटाचा विषय बोल्ड असला आणि मेसेज पाहून हा चित्रपट हिट होईल, असेही काहींचे म्हणणे आहे. जनहित में जारी चित्रपटाच्या पोस्टर्सवर मजेशीर स्लोगन आहेत. चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ट्रेलर ६ मे रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.