'प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा...', संविधानाची प्रस्तावना शेअर करताच लोकप्रिय अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 01:20 PM2024-01-24T13:20:22+5:302024-01-24T13:26:33+5:30
लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेनची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
कोट्यावधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीराम यांची अयोध्येत सोमवारी (२२ जानेवारी २०२४) प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे आणि यासोबतच अनेक वर्षांची प्रतीक्षा देखील संपली. या सोहळ्यात उद्योग, राजकारण, मनोरंजन आणि क्रीडा जगतातील अनेक दिग्गज उपस्थित होते. जगभरात भक्तांनी राम आगमनाचा जल्लोष साजरा केला. यातच एका लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेनची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये भारतीय संविधाची प्रस्तावना शेअर केली. मुळात अतुल मोंगिया यांनी इन्स्टाग्रामवर भारतीय संविधाची प्रस्तावना शेअर केली होती. कॅप्शनमध्ये त्यांनी “माझ्या देशावर माझे प्रेम आहे आणि द्वेषाचे राजकारण हे बदलू शकत नाही” असं लिहलं होतं. यासोबतचं एआर रहमानचं 'ये जो देश है मेरा' हे गाणेही जोडलं होतं. त्यांची हीच पोस्ट सुष्मिता सेनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. यासोबत तिनं ‘मातृभूमी’ असा हॅशटॅग दिला.
सुष्मिता सेनने तिच्या पोस्टमध्ये कुठेच प्रभू श्रीराम किंवा राम मंदिराचा उल्लेख केला नाही. मात्र संविधानाच्या प्रस्तावनेचा फोटो शेअर करत तिने रामभक्तांवर निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे. यावरूनच अनेकांनी तिला सवाल केला आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहलं, 'प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात घृणास्पद काय झालं?' तर एका युजरने म्हटले की, 'केवळ मुर्खतेमध्येच पीएच.डी.ची पदवी घेतलेली व्यक्तीच असे बोलू शकते'. तर आणखी एकाने लिहलं, जे स्वतः द्वेषाने भरलेले असतात, ते जनभावना कसे समजून घेणार'. तर दुसरीकडे काही युजर्संनी सुष्मिता सेनचे कौतुकही केलं आहे.
Sushmita Sen, Bollywood actress has shared the Constitution of India on her Instagram story.
— Amock (@Politics_2022_) January 22, 2024
And the quote written is "no politics of hatred will change my nation"🔥#RamMandirPranPrathisthapic.twitter.com/JOGJ5blAUC
केवळ सुष्मिता सेनच नाही तर चित्रपटसृष्टीतील इतरही काही कलाकारांनी सोशल मीडियावर भारताच्या संविधानाची प्रस्तावना शेअर केली आहे. तर दुसरीकडे हिंदी आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली. यात अमिताभ बच्चन ते कंगना रणौत, रणबीर कपूर-आलिया भट्ट, कतरीना कैफ-विकी कौशल ते आयुष्मान खुराना, राजकुमार हिरानी, जॅकी श्रॉफ, राम चरण हे राम मंदिराच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.