विनेश फोगाटचं स्वप्न भंगलं; स्वरा भास्कर संतापली, म्हणते, "कोणाला विश्वास बसेल..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 02:04 PM2024-08-08T14:04:25+5:302024-08-08T14:09:52+5:30
भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी वजन वाढल्यामुळे ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्यात आले.
Swara Bahskar Tweet On Vinesh Phogat Disqualification In Paris Olympic 2024 : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी वजन वाढल्यामुळे ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्यात आले. कुस्तीपटू विनेश फोगाट ५० किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या अंतिम सामन्यात खेळणार होती. अवघे १०० ग्रॅम वजन अधिक भरल्याने विनेश ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेच्याअंतिम सामन्यासाठी अपात्र ठरली. त्यामुळे सर्व भारतीयांचे मन हळहळले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेमधून विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर कोट्यवधी भारतीय जनतेची निराशा झाली. त्यावर आता वेगवेगळ्या स्तरातून यावर नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यात बॉलिवूड कलाकारही कुठे मागे नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन विश्वातील मंडळी व्यक्त होताना दिसत आहेत.
अशातच बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. स्वरा भास्कर कायमच तिच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत येत असते. सोशल वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर ती भाष्य करताना दिसते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम लढतीआधी विनेश फोगाट अपात्र ठरवल्यानंतर या निर्णयावर तिने प्रश्न उपस्थित केला आहे.
Who believes this 100grams over weight story??? 💔
— Swara Bhasker (@ReallySwara) August 7, 2024
स्वरा भास्करने एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने लिहलंय, "कोणाचा १०० ग्रॅम वजन जास्त असण्याच्या या निर्णयावर विश्वास आहे". असं लिहत अभिनेत्रीने नेटकऱ्यांना प्रश्न विचारला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर स्वरा भास्करचं हे ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे. पॅरिस ऑलिम्पकमध्ये विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी ही सवाल उपस्थित केला आहे. स्वरा भास्करच्या पोस्टवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहलंय, "एक मुलगा, मुलगी बनून सगळे खेळ खेळून गेला, तेव्हा त्याचे कोणतेही पॅरामीटर काम करत नव्हते". अशा कमेंट करत उपस्थित करत नेटकऱ्यांनी स्वरा भास्करच्या पोस्टवर रिप्लाय दिले आहेत.