बॉयफ्रेंडशी लग्न करण्याच्या चर्चांवर तापसी पन्नू रोखठोक बोलली, म्हणाली- "मी आजपर्यंत कधीच..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 08:28 PM2024-02-28T20:28:56+5:302024-02-28T20:29:22+5:30
तापसी पन्नू गेल्या १० वर्षांपासून मथियासला डेट करतेय
Taapsee Pannu Marriage With Boyfriend Mathias Boe: आधी साऊथ फिल्म इंडस्ट्री अन् नंतर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री तापसी पन्नू सध्या चर्चेत आहे. एका रिपोर्टनुसार, ती आणि तिचा प्रियकर बॅडमिंटनपटू मथियास बोई याच्या सोबत लग्न करणार आहे. गेली १० वर्षे डेटिंग केल्यानंतर आता ते लग्न करणार असल्याची बातमी समोर येत आहे. मथियास बोई हा माजी डॅनिश बॅडमिंटनपटू आहे, जो चार वर्षांपूर्वी 2020 मध्ये निवृत्त झाला. सध्या तिचा भावी पती कोण इथपासून ते तिच्या लग्नाचं लोकेशन काय असणार, यापर्यंत अनेक गोष्टींची चर्चा होऊ लागली आहे. पण याचदरम्यान, आता स्वतः तापसी पन्नूने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत त्यांना त्यांच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या चर्चेबद्दल विचारण्यात आले. मात्र, याबाबत तिने स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. ती अतिशय सहजपणे म्हणाली, "मी आजपर्यंत कधीच माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही आणि कधीच देणार नाही." त्यामुळे ती सध्या लग्नाचा विचार करतेय की नाही, याबाबत काहीच स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
एका रिपोर्टनुसार, तापसी आणि मथियास मार्चमध्ये उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात आले. या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे बॉलीवूड स्टार्स उपस्थित राहणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे. शीख आणि ख्रिश्चन धर्माच्या रितीरिवाजानुसार दोघेही लग्न करणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र तापसीच्या मनात नक्की काय सुरूए याचा तिने फारसा थांगपत्ता लागू दिलेला नाही.
तापसीच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, ती गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शाहरुख खानसोबत 'डंकी' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने जगभरात ४५० कोटींहून अधिक कमाई केली. चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई केल्यानंतर हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवरही चांगली व्ह्यूवरशिप मिळवताना दिसत आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी OTT वर प्रदर्शित झाला. तेव्हापासून तो नेटफ्लिक्सवर सतत ट्रेंड करत आहे.