डेब्यू चित्रपटाचं शूटिंग अन् टेकडीवरून कोसळली अभिनेत्री मेंदुला झाली होती गंभीर दुखापत, म्हणते-"मृत्यूच्या दारातून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 12:55 PM2024-11-01T12:55:27+5:302024-11-01T13:01:40+5:30

अभिनेत्री तनिषा मुखर्जीने तिच्या डेब्यू फिल्मचा एक किस्सा सांगितला आहे.

bollywood actress tanishaa mukerji revealed in interview about falling from mountain during first film shooting faced brain damage | डेब्यू चित्रपटाचं शूटिंग अन् टेकडीवरून कोसळली अभिनेत्री मेंदुला झाली होती गंभीर दुखापत, म्हणते-"मृत्यूच्या दारातून..."

डेब्यू चित्रपटाचं शूटिंग अन् टेकडीवरून कोसळली अभिनेत्री मेंदुला झाली होती गंभीर दुखापत, म्हणते-"मृत्यूच्या दारातून..."

Tanishaa Mukerji : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांच्या दोन्ही मुलींनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यात काजोलला (kajol) पाहिजे तस स्टारडम मिळाला पण धाकटी मुलगी तनिषाला (Tanishaa Mukerji) फार काही चांगली कामगिरी करता आली नाही. अभिनेत्रीने अगदी काही मोजक्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच अभिनेत्रीने तिच्या करिअरमधील डेब्यू फिल्मचा भयावह किस्सा सांगितला आहे.

अगदी काही महिन्यापूर्वीच तनिषाने आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत,आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्य मुलाखतीत तिच्या करिअरवर भाष्य केलं होतं. तनिषा मुखर्जीने २००३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘श्शsss’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण, बॉक्सऑफिसवर हा चित्रपट चांगली कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटात अभिनेत्रीने डीनो मारियोसोबत स्क्रीन शेअर केली होती. दरम्यान, चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना अभिनेत्रीसोबत भयावह प्रसंग घडला होता. त्याबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीत खुलासे केले.
 
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत, तनिषा म्हणाली,  "मी माझ्या करिअरमध्ये पहिला चित्रपट करत होते. चित्रपटाचं शूटिंग करताना माझ्यासोबत विचित्र घटना घडली. शूटिंग करत असताना मी माझा अपघात झाला. मी उंच टेकडीवरुन कोसळले होते. त्यामुळे माझ्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर मला प्रचंड त्रास सहन करावा लागला. मी मृत्यूच्या दारातून परत आले होते. जवळपास १ वर्षभर मला EEG करावं लागत होतं. कारण, मेंदूला आलेली सूज कमी झालीये की नाही हे सतत तपासावं लागायचं".

"मी याविषयी कोणालाच काही सांगितलं नाही पण मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मी २ तास शूट करायचे आणि ३ तास झोपायचे. माझं शरीर इतकं थकायचं की २ तासाच्यावर मला शूट करता येत नव्हतं. मला चक्कर यायची किंवा मी बेशुद्ध पडायचे. मी प्रयत्न करुन सुद्धा मला जागं राहता येत नव्हतं. माझा मेंदू थकून जायचा", असं तनिषा म्हणाली.

Web Title: bollywood actress tanishaa mukerji revealed in interview about falling from mountain during first film shooting faced brain damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.