"तिच्याशी कुणी लग्न करणार नाही..", प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरच्यांना ऐकावे लागले होते लोकांचे टोमणे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 11:46 AM2024-09-20T11:46:56+5:302024-09-20T11:52:34+5:30
'अॅनिमल' या बहुचर्चित चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी रातोरात स्टार झाली.
Triptii Dimri: 'अॅनिमल' या बहुचर्चित चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी रातोरात स्टार झाली.या चित्रपटानंतर तिच्याकडे मोठ-मोठ्या प्रोजेक्ट्सची रांग लागली. तृप्तीने स्वत: च्या मेहनतीच्या जोरावर तिने मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या आगामी 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. त्यादरम्यान तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
लोकांचे टोमणे ऐकावे लागले-
तृप्ती डिमरीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी 'नॅशनल क्रश' हा टॅग दिलाय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने धक्कादायक खुलासा केला आहे.कतरिना कैफचा ब्यूटी ब्रॅंड 'केब्यूटी' च्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, "मी उत्तराखंडची आहे. परंतु मी दिल्लीतच लहाणाची मोठी झाले. माझे आई-वडील आणि मी दिल्लीतच वास्तव्यास होतो. तेव्हा अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी माझ्या आई-वडिलांना लोकांचे टोमणे ऐकावे लागले होते. तुमच्या मुलीसोबत कुणी लग्न करणार नाही असं लोक माझ्या घरच्यांना बोलायचे".
पुढे तृप्ती डिमरी म्हणाली, "जेव्हा मी मुंबईत आली तो काळ माझ्यासाठी संघर्षाचा होता. त्यावेळी घरातून बाहेर पडताना ५०-६० लोकांच्याा समोरून जावं लागतं असे. त्यावेळेस काही लोकांनी माझ्या आई-वडिलांना खूप काही सुनावलं". असा खुलासा तिने केला.
तृप्ती डिमरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात घर केलं.अलिकडेच विकी कौशल - तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असलेला 'बॅड न्यूज' सिनेमा लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही १०० पेक्षा जास्त कोटींचा व्यवसाय केला. त्यामुळे तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली. याशिवाय 'अॅनिमल' या सिनेमात तिने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तिला खऱ्या अर्थाने नवी ओळख मिळवून दिली.