"खंडेरायाच्या लग्नाला…" विद्या बालनचा लोकप्रिय मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 12:31 IST2025-03-01T12:23:16+5:302025-03-01T12:31:39+5:30

विद्या बालनचा मराठी गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल.

bollywood actress vidya balan dance on khanderayachya lagnala banu navri natali video viral | "खंडेरायाच्या लग्नाला…" विद्या बालनचा लोकप्रिय मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

"खंडेरायाच्या लग्नाला…" विद्या बालनचा लोकप्रिय मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Vidya Balan Dance Video:विद्या बालन (Vidya Balan) ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ९० दशकांपासून तिने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. बंगाली चित्रपटातून करिअरची सुरुवात करत तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत एक हक्काचं स्थान निर्माण केलं. दरम्यान, विद्या बालन तिच्या चित्रपटांसह सोशल मीडियावरील रिल्स, व्हिडीओंमुळे बऱ्याचदा चर्चेत येते. शिवाय विद्या बालन अनेकदा मराठी गाण्यांवर थिरकताना दिसते आणि रील्स शेअर करताना दिसते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विद्याचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.


नुकताच विद्या बालनने इन्स्टाग्रामवर डान्स करतानाचा एक धमाल व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिच्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री  खंडेरायाच्या लग्नाला बानू नटली या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत विद्याने "नवरी नटली, सुपारी फुटली...", या आशयाचे कॅप्शन दिले आहे. अभिनेत्रीचा हा सुंदर  व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला हे.

दरम्यान, या गाण्याचे बोल बोलत जबरदस्त एक्सप्रेशन्स देत विद्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचा पाहायला मिळतोय. सगळ्यात लक्षवेधी बाब म्हणजे अभिनेत्रीने या व्हिडीओसाठी अगदी मराठमोळा लूक केला आहे. सुंदर साडी परिधान करुन तसेच केसात गजरा अशा पारंपरिक अंदाजात ती पाहायला मिळते आहे. विद्याच्या या व्हायरल व्हिडीओवर मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर, अमृता खानविलकर यांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे.

Web Title: bollywood actress vidya balan dance on khanderayachya lagnala banu navri natali video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.