विद्या बालन पडली 'भाडिपा'च्या प्रेमात; 'अतिशय युनिक'वर शेअर केला जबरदस्त व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 15:10 IST2024-06-26T15:06:20+5:302024-06-26T15:10:54+5:30
Vidya Balan: विद्या बालनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहेत.

विद्या बालन पडली 'भाडिपा'च्या प्रेमात; 'अतिशय युनिक'वर शेअर केला जबरदस्त व्हिडीओ
सध्याच्या काळात सोशल मीडियावर दररोज असंख्य ट्रेंड व्हायरल होत असतात. यात कधी एखादं गाणं असतं तर कधी एखादा युनिक डायलॉग. यामध्येच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'पुष्पा 2' या सिनेमातील अंगारों से आणि 'भाडिपा'चं 'अतिशय युनिक' या दोन गाण्यांनी तर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भाडिपाच्या गाण्यावर तर लाखोंच्या संख्येने लोकांनी रिल्स केले आहेत. विशेष म्हणजे या गाण्याची भूरळ बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिला सुद्धा पडली आहे.
गेल्या काही काळात अनेक बॉलिवूड कलाकारांची पावलं मराठी सिनेसृष्टीकडे वळत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी मराठी सिनेमात काम केलं आहे. इतकंच नाही तर ते सोशल मीडियावरही मराठी कलाविश्वाशी निगडीत गोष्टी शेअर करत आहेत. वा, त्यांचं प्रमोशन करतांना दिसत आहेत. यामध्येच विद्या बालनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
विद्याने इन्स्टाग्रामवर नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने भाडिपाच्या आलोक राजवाडे याच्या अतिशय युनिक या गाण्यावर जबरदस्त एक्स्प्रेशन्स दिले आहेत. विशेष म्हणजे ती या व्हिडीओमध्ये चक्क हे गाण म्हणतांना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिचं विशेष कौतुक केलं आहे.