पुरस्काराऐवजी हातात दिला नारळ, आऊटफिटवरून केलं टार्गेट; विद्या बालनने सांगितला इंडस्ट्रीतील वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 17:25 IST2024-04-25T17:23:24+5:302024-04-25T17:25:42+5:30
विद्या बालन हे नाव बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर येत. झिरो फिगरचा ट्रेंड मोडून काढत अभिनेत्रीने कलाविश्वात स्वत:ची वेगळी अशी छबी उमटवली.

पुरस्काराऐवजी हातात दिला नारळ, आऊटफिटवरून केलं टार्गेट; विद्या बालनने सांगितला इंडस्ट्रीतील वाईट अनुभव
Vidya Balan : आपल्या दमदार अभिनयाबरोबर मिश्किल स्वभावशैलीमुळे विद्या कायमच लाइमलाईटमध्ये असते. सध्या अभिनेत्री तिचा सिनेमा 'दो और दो प्यार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात विद्या अभिनेता प्रतिक गांधीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसते. अलिकडेच विद्याने एक मुलाखत दिली. त्यामध्ये तिने एका अवॉर्ड शो-मध्ये आलेला वाईट अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला.
सैमडिशला दिलेल्या मुलाखतीत तिने अनुभवलेल्या एका वाईट प्रसंगावर भाष्य केलं. 'हे बेबी' या चित्रपटानंतर विद्याने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या चित्रपटामधील विद्याच्या आऊटफिटवरून तिला टार्गेट करण्यात आलं होतं. सिनेमाच्या दिग्दर्शकाने आणि डिझायनरने याबाबतीत कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिला होता.
''एका मजेदार सेगमेंट दरम्यान 'हे बेबी' या सिनेमासाठी बेस्ट आऊटफिट पुरस्काराकरिता माझ्या नावाची घोषणा करण्यात आली. पण त्यावेळी त्यांनी पुरस्काराऐवजी माझ्या हातात नारळ दिला. तेव्हा मी त्यांना म्हणाले मीच का? माझे कपडे ही फक्त माझी निवड नाही. त्यावेळी मला कोणत्याही गोष्टीवर मत मांडायचं नव्हतं. शाहरुख खान आणि सैफ अली खान या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत होते. आम्ही फक्त गंमत करत आहोत म्हणून हा तुला हा अवॉर्ड देत आहोत, असं ते म्हणाले. पण मी त्यावेळी हा पुरस्कार कॉस्ट्यूम डिझायनर आणि दिग्दर्शकांसोबत शेअर करणार आहे, असं म्हणाले. त्यावेळी त्यांनी मला तू असं करू शकत नाही असं सांगितल. ''
पुढे विद्या म्हणाली, ''त्यावेळी हा नारळाच्या स्वरुपातील पुरस्कार दुसऱ्या अभिनेत्रीला देण्यात येणार होता. पण तिला यामागंच खरं कारण कळालं आणि मग तिने नॉमिनेशन मधून माघार घेतली.''
घडल्या प्रकारानंतर विद्याच्या लक्षात आलं कि तिला टार्गेट करण्यात आलं होतं. या अवॉर्ड -शोमध्ये तिने दिग्दर्शक आणि डिझायनरचं नाव घेतल्यामुळे तिला बऱ्याच जणांच्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. त्यामुळे मी पूर्णपणे खचले होते. स्वत: ला एकटी समजू लागले. अशी प्रतिक्रिया विद्याने दिली.