नवऱ्याने सोडली साथ,बॉयफ्रेंडने ढकललं वेश्याव्यवसायात; मृत्यूनंतर हातगाडीवरुन नेला अभिनेत्रीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 02:27 PM2023-08-14T14:27:21+5:302023-08-14T14:27:46+5:30

Bollywood actress: विमीने जितकी लोकप्रियता मिळवली तितक्याच पटकन ती लोकांच्या नजरेतून गायब सुद्धा झाली.

bollywood actress-vimi-life-story-died-at-the-age-of-34 | नवऱ्याने सोडली साथ,बॉयफ्रेंडने ढकललं वेश्याव्यवसायात; मृत्यूनंतर हातगाडीवरुन नेला अभिनेत्रीचा मृतदेह

नवऱ्याने सोडली साथ,बॉयफ्रेंडने ढकललं वेश्याव्यवसायात; मृत्यूनंतर हातगाडीवरुन नेला अभिनेत्रीचा मृतदेह

googlenewsNext

बॉलिवूडच्या इतिहासात अशा कितीतरी अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलिवूडचा काळ गाजवला. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे विमी. उत्तम अभिनयामुळे तिने बॉलिवूडमध्ये तुफान लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे तिची फिल्मी कारकिर्द कमी होती. मात्र, या कमी काळातही तिने यश, संपत्ती, प्रसिद्धी सारं काही मिळवलं होतं. परंतु, विमीने जितकी लोकप्रियता मिळवली तितक्याच पटकन ती लोकांच्या नजरेतून गायब सुद्धा झाली. परंतु, फिल्मी करिअर गाजवणाऱ्या विमीचं खासगी जीवन अत्यंत वेदनादायी ठरलं.

विमीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यावेळी तिचं लग्न झालं होतं. इतकंच नाही तर ती दोन मुलांची आईदेखील होतील. सुनील दत्तपासून ते शशी कपूरपर्यंत तिने अनेक बड्या लोकांसोबत काम केलं. हमराज या सिनेमातून तिने कलाविश्वात एन्ट्री केली. विशेष म्हणजे पहिल्याच सिनेमातून रातोरात स्टार झालेली विमी ६० च्या दशकात ३ लाख रुपये मानधन घेत होती. परंतु, पतीपासून ती विभक्त झाली आणि तिच्या आयुष्याला उतरती कळा लावली.

प्रियकराने ढकललं वेश्याव्यवसायात

पतीपासून विभक्त झाल्यानंतर विमी एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. मात्र, या व्यक्तीला दारुचं व्यसन जडलं. विशेष म्हणजे दारुच्या आहारी जात त्याने चक्क विमीला वेश्यावसायात ढकललं.याच काळात तिचं करिअरसुद्धा बर्बाद व्हायला लागलं होतं. केवळ १० वर्षात तिचं करिअर संपलं. ज्यामुळे ती शेवटी एकटीच पडली.

हातगाडीवरुन नेला मृतदेह

अखेरच्या दिवसात विमी प्रचंड एकटी पडली होती. वयाच्या ३४ व्या वर्षी विमी गंभीर आजारी पडली. त्यातच आर्थिक चणचण निर्माण झाली होती. त्यामुळे आजारपणात तिला हॉस्पिटलच्या जनरल  वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. ज्यावेळी विमीचा मृत्यू झाला त्यावेळी तिच्या पार्थिवाला खांदा द्यायलाही कोणी नव्हतं. इतकंच नाही तर तिला स्मशानभूमीत नेण्यासाठीही कोणी तयार नव्हतं. त्यामुळे अखेर हातगाडीवरुन तिचा मृतदेह न्यावा लागला.

Web Title: bollywood actress-vimi-life-story-died-at-the-age-of-34

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.