बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला टायगर श्रॉफसोबत करायचाय कॉमेडी चित्रपट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 19:20 IST2020-02-22T19:19:40+5:302020-02-22T19:20:15+5:30
‘बागी’ च्या पहिल्या भागात ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता पुन्हा एकदा बागी ३मधून ही जोडी भेटीला येणार आहे.

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला टायगर श्रॉफसोबत करायचाय कॉमेडी चित्रपट !
बॉलिवूडच्या ऑनस्क्रीन पसंत केल्या जाणाऱ्या जोड्यांपैकी एक म्हणून श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांना मानले जाते. ‘बागी’ च्या पहिल्या भागात ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता पुन्हा एकदा बागी ३मधून ही जोडी भेटीला येणार आहे. पण, आता मात्र श्रद्धा कपूर हिने एक वेगळीच इच्छा बोलून दाखवलीय. ती म्हणजे श्रद्धाला टायगर श्रॉफसोबत कॉमेडी चित्रपटात काम करायचेय.
अलीकडेच झालेल्या मुंबई मिररसोबतच्या मुलाखतीत तिने सांगितले,‘ मी टायगर श्रॉफसोबत काम करून खुपच प्रभावित झाले आहे. टायगर जे अॅक्शनवर आधारित सीन्स पडद्यावर करतो, त्यासोबतच त्याच्याकडे सेन्स ऑफ ह्युमरही तेवढाच आहे. त्यामुळे मला असे वाटते की, त्याच्यासोबत एखाद्या कॉमेडी चित्रपटात काम करायला मला आवडेल. ’
सध्या श्रद्धा आणि टायगर हे दोघेही ‘बागी ३’च्या प्रमोशनमध्ये प्रचंड बिझी आहेत. ‘बागी २’ मध्ये टायगरसोबत दिशा पटानी दिसली होती. आता तिसऱ्या भागातही दिशा असणार आहे, पण तिचा कॅमिओ रोल असणार आहे. हा चित्रपट ६ मार्चला रिलीज होणार आहे.