'कभी ईद कभी दिवाली'मध्ये सलमान खानसोबत बॉलिवूडची ही अभिनेत्री करणार रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 17:29 IST2020-02-11T17:29:02+5:302020-02-11T17:29:40+5:30
'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटात 'हाऊसफुल ४'मधील ही अभिनेत्री रोमान्स करताना दिसणार आहे.

'कभी ईद कभी दिवाली'मध्ये सलमान खानसोबत बॉलिवूडची ही अभिनेत्री करणार रोमान्स
'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर आता यात सलमान खानसोबत अभिनेेत्री पूजा हेगडेची या चित्रपटात वर्णी लागली आहे. पूजा या चित्रपटात सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटात पूजा हेगडे सलमान खानच्या प्रेयसीची भूमिका करताना दिसणार आहे. पूजाबद्दल सांगताना निर्माता व लेखक साजिद नाडियादवाला म्हणाला की, 'हाऊसफुल ४'मध्ये पूजासोबत काम केल्यानंतर, आम्हाला हे जाणवले की ती या चित्रपटासाठी एकदम परफेक्ट आहे आणि सलमानसोबत तिची जोडी चांगली वाटेल. या कथेत नावीण्य आणेल.”
सलमान खान, साजिद नाडियाडवाला आणि ईद रिलीज हे नेहमीच एक झक्कास समीकरण राहिले आहे. या तिकडीने नेहमीच अनेक ब्लॉकबस्टर हिट दिले आहेत. याबाबत बोलताना साजिद म्हणाले, "जुडवा सलमान आणि बॉलिवूडची पहली ईद रिलीज होती. एवढेच कशाला माझ्या दिग्दर्शनात सुरु झालेली किक देखील सणाच्याच दिवशी झाली होती. "
सलमान आणि पूजा यांची जोडी पहिल्यांदाच समोर येत आहे आणि याचा ट्रैकदेखील ह्यूमरने पुरेपूर आहे, निर्मात्यांनी अक्टूबरमध्ये पहिल्या शूट शेड्यूलसाठी अनेक वर्कशॉपची योजना बनवाली आहे ज्यामुळे या जोड़ीला एकमेकांसोबत कम्फर्टेबल होण्यास मदत मिळेल.
सलमान खान या चित्रपटात एकदम नव्या अवतारात दिसणार आहेत आणि त्याच्या लूकची चर्चा सुरू आहे. त्याची प्रेमिका एका छोट्या शहरातील पारंपारिक मुलगी असून सलमानहून खूप वेगळी आहे.
फरहाद समाजी दिग्दर्शित 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटात कौटुंबिक ड्रामा पहायला मिळणार आहे. हा चित्रपट ईद २०२१ला प्रदर्शित होणार आहे.