'कोणाकडे काम मागायला जाऊ शकत नाही'; ' मणिकर्णिका'नंतर बंद झाला अंकितासाठी बॉलिवूडचा दरवाजा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 17:30 IST2023-03-14T17:30:00+5:302023-03-14T17:30:00+5:30
Ankita lokhande: २०१९ मध्ये कंगना रणौतच्या (kangana ranaut) 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमातून अंकिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

'कोणाकडे काम मागायला जाऊ शकत नाही'; ' मणिकर्णिका'नंतर बंद झाला अंकितासाठी बॉलिवूडचा दरवाजा?
'पवित्र रिश्ता' (pavitra rishta) या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे (ankita lokhande). या मालिकेमुळे अंकिताला प्रचंड लोकप्रियता मिळाली. छोटा पडदा गाजवल्यानंतर अंकिताने २०१९ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु, त्यानंतर ती कोणत्याही सिनेमात झळकली नाही. यामागचं कारण तिने एका मुलाखतीत दिलं आहे.
२०१९ मध्ये कंगना रणौतच्या (kangana ranaut) 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमातून अंकिताने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमात तिने केलेल्या अभिनयाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. परंतु, त्यानंतर ती कोणत्याही बॉलिवूडपटात दिसली नाही. याविषयी एका मुलाखतीत तिला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी कोणाकडे काम मागायला जाऊ शकत नाही, असं उत्तर तिने दिलं.
"कलाविश्वात माझा कोणी गॉडफादर नाहीये. माझ्यात टॅलेंट आहे. पण, एखादं काम आलं तर मी ते स्वीकारणं किंवा नाकारणं या गोष्टी घडू शकतात ना. बॉलिवूड फार वेगळं आहे. अनेक जण म्हणतात, की माझ्याकडे चांगल्या ऑफर येत नाहीये. पण, तसं नाहीये. माझ्याकडे कोणतीही ऑफर आलेली नाही. त्यामुळे नकार द्यायचा प्रश्नच नाही. आणि, मी कोणाकडेही काम मागायला जाऊ शकत नाही", असं अंकिता म्हणाली.
दरम्यान, अंकिताने 'मणिकर्णिका'मध्ये झलकारीबाई ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुकही झालं. अंकिताने पवित्र रिश्तामधून बरीच लोकप्रियता मिळवली. याच मालिकेच्या सेटवर अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) याच्यासोबत अंकिताचं सूत जुळलं होतं. मात्र, त्यानंतर काही वर्षांत त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर अंकिताने विकी जैनसोबत (vicky jain) लग्नगाठ बांधली.