बॉलिवूडचे अवॉर्ड आणि वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 03:28 PM2017-04-14T15:28:57+5:302017-04-14T21:25:44+5:30
तब्बल २५ वर्षांनंतर अभिनेता अक्षयकुमार याला त्याच्या ‘रुस्तम’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय अवॉर्ड घोषित झाला अन् एकच वादंग निर्माण झाले. अक्षयला ...
त ्बल २५ वर्षांनंतर अभिनेता अक्षयकुमार याला त्याच्या ‘रुस्तम’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय अवॉर्ड घोषित झाला अन् एकच वादंग निर्माण झाले. अक्षयला हा पुरस्कार चित्रपटासाठी की राष्ट्रीयत्वासाठी, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला. ‘दंगल‘, ‘अलीगढ’, ‘उडता पंजाब’ यांसारखे दमदार चित्रपट असताना राष्ट्रीय पुरस्काराच्या शर्यतीत ‘रुस्तम’च का अव्वल ठरला जावा? या चित्रपटात अक्षयच्या अभिनयाची अशी कोणती छाप बघावयास मिळाली की त्याला थेट राष्ट्रीय पुरस्कार बहाल केला गेला? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता तर या ६४व्या अवॉर्डचे ज्यूरी हेड प्रियदर्शन हे अक्षयचे चांगले मित्र असल्यानेच त्याला अवॉर्ड दिला गेल्याचे बोलले जात असल्याने अक्षयचा अवॉर्ड वादाच्या भोवºयात सापडला आहे. मात्र बॉलिवूडमध्ये अवॉर्ड आणि वाद काही नवीन नाहीत, यापूर्वीदेखील अवॉर्डवरून बºयाचदा रणकंदन पेटले गेले, त्याचाच हा आढावा...
तीस हजार रुपयांत अवॉर्ड
अभिनेते ऋषी कपूर यांनी तर अतिशय खुल्लम खुल्ला बॉलिवूड अवॉर्डमागचे वास्तव जगजाहीर केले. त्यांनी म्हटले होते की, १९७३ रोजी रिलीज झालेल्या ‘बॉबी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ३० हजार रुपयांमध्ये खरेदी केला होता. तेव्हापासून अमिताभ बच्चन माझ्याविषयी नाराज आहेत. कारण ‘जंजीर’ या चित्रपटासाठी त्यांना या पुरस्काराची अपेक्षा होती. आपल्या ‘खुल्लम खुल्ला’मध्ये बायोग्राफी त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला होता. ते म्हणाले की, त्यावेळी मला एका व्यक्तीने पुरस्कारासाठी तीस हजार रुपयांची मागणी केली होती, मी त्याला तीस हजार रुपये दिले अन् पुरस्कार नावावर करून घेतला.
अजयचा बॉयकॉट
‘सिंघम’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अजय देवगण हा जेवढा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तेवढाच त्याच्या स्वभावामुळेही तो चर्चेत असतो. अजय अन् अवॉर्ड शोविषयी बोलायचे झाल्यास त्याने अवॉर्ड शोला केव्हाच बॉयकॉट केले आहे. ‘जख्म’ आणि ‘लिजेंड आॅफ भगत सिंग’ या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले, मात्र त्यानंतर त्याला कोणीही महत्त्व दिले नाही.
आमिरला नॉमिनेशनही नको
आमिर खान आणि अवॉर्ड शो यांचा जणू काही ३६चा आकडा आहे. कारण आमिरने हे शो केव्हाच बॉयकॉट केले आहेत. जेव्हा आमिरच्या ‘लगान’ला अवॉर्ड शोमध्ये स्थान दिले गेले नाही तेव्हापासून त्याने अवॉर्ड सोहळ्यांवर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे. जे चित्रपट तो प्रोड्युस करतो, त्याची साधी क्लिपही तो नॉमिनेशनसाठी पाठवित नाही.
कंगनाच्या अवॉर्डवर दीपिकाचा डोळा
अभिनेत्री कंगना राणौत हिचा अवॉर्ड शोविषयी वेगळाच वाद आहे. कारण तिच्या वाट्याला येणारे बरेचसे अवॉर्ड हे दीपिकाने पळविले आहेत. कंगनाचा पारा तर तेव्हा चढला होता जेव्हा ‘क्वीन’ऐवजी ‘हॅप्पी न्यू इयर’ या चित्रपटासाठी दीपिकाला गौरविण्यात आले होते. त्यामुळे तिने अवॉर्ड शोवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.
‘मेरी कॉम’ला डावलले
प्रियंका चोपडा हिने तर तिच्या ‘मेरी कॉम’ या चित्रपटाला अवॉर्ड शोमध्ये डावल्याने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. हा चित्रपट पुरस्काराचा दावेदार असताना भलत्याच चित्रपटाला पुरस्कार दिला जात असल्याचे प्रियंकाने म्हटले होते. ‘मेरी कॉम’ऐवजी दीपिका पादुकोणच्या ‘हॅप्पी न्यू इयर’ला अवॉर्ड दिला गेला होता.
आशुतोषचा राग
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी तर जाहीरपणे अवॉर्डविषयी नाराजी व्यक्त केली होती. आयफा अवॉर्ड शोमध्ये आशुतोषच्या ‘जोधा अकबर’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिला गेला होता. जेव्हा आशुतोष ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्टेजवर गेले होते, तेव्हा त्यांनी माइकमध्ये जाहीरपणे बोलताना म्हटले होते की, प्रियंका मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, परंतु तुला बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड कसा मिळू शकतो. कारण या कॅटेगिरीत ऐश्वर्या रायला नॉमिनेशन मिळाले आहे. ऐश्वर्या ‘जोधा अकबर’मध्ये मुख्य भूमिकेत होती.