३५ कोटींचं बजेट अन् कमावले फक्त १० हजार, २०२३मध्ये सुपरफ्लॉप ठरला 'हा' बॉलिवूड सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 05:45 PM2024-01-01T17:45:56+5:302024-01-01T17:46:58+5:30
फक्त ५० तिकिटे विकिली गेली, कमावले केवळ १० हजार; २०२३ मधील सुपरफ्लॉप सिनेमा
२०२३ वर्षात बॉलिवूडने बॉक्स ऑफिस गाजवलं. अनेक मोठे सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. किंग खानच्या 'पठाण' सिनेमाने २०२३ची दणक्यात सुरुवात केली. या सिनेमाने जगभरात तब्बल १ हजार कोटींहून अधिकची कमाई केली. त्यानंतर 'जवान', 'गदर २', 'अॅनिमल' हे सिनेमे २०२३मधील सुपरहिट बॉलिवूड सिनेमांच्या पंगतीत जाऊन बसले. एकीकडे बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या बॉलिवूडमध्ये असाही एक सिनेमा आहे जो सुपरफ्लॉप ठरला.
बॉलिवूड सिनेमांची २०२३मध्ये चलती पाहायला मिळायली. पण, बॉलिवूडमधील असाही एक सिनेमा आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर काही हजार रुपयांची कमाई केली. ऑगस्ट २०२३मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची देशभरात केवळ ५० तिकिटे विकली गेली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त १० हजार रुपयांचा बिझनेस केला. त्यामुळे २०२३ या वर्षातील हा सिनेमा बॉलिवूडमधील सुपरफ्लॉप ठरला आहे.
'पंच क्रिती फाइव्ह इलेमेंट्स' हा सिनेमा २०२३च्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झाला होता. संजोय भार्गव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. तर बिजेंद्र काला, पूर्वा पराग, उमेश बाजपायी, तन्मय चतुर्वेदी अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती. ३५ कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे 'पंच क्रिती फाइव्ह इलेमेंट्स' सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फार कमाई करता आली नाही.
ऑगस्ट महिन्यातच सनी देओलचा 'गदर २' आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी २' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यामुळे 'पंच क्रिती फाइव्ह इलेमेंट्स' बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत मागे पडला. त्यानंतर शाहरुखचा बिग बजेट 'जवान' सिनेमा थिएटरमध्ये आल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसला पछाडून काढलं. त्यामुळे 'पंच क्रिती फाइव्ह इलेमेंट्स' हा सिनेमा थिएटरमधून बाहेर पडला