Bollywood box office: आयुष्यमान खुराणाची ‘हॅट्रिक’; Andhadhun हिट!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 08:23 PM2018-10-11T20:23:23+5:302018-10-11T20:26:46+5:30
आयुष्यमान खुराणा, राधिका आपटे व तब्बू स्टारर ‘अंधाधुन’ या चित्रपटाला समीक्षकांनी चांगली दाद दिली. प्रेक्षकांनाही हा चित्रपट तितकाच भावला. परिणामी बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाची लक्षवेधी कामगिरी केली आहे.
आयुष्यमान खुराणा, राधिका आपटे व तब्बू स्टारर ‘अंधाधुन’ या चित्रपटाला समीक्षकांनी चांगली दाद दिली. प्रेक्षकांनाही हा चित्रपट तितकाच भावला. परिणामी बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाची लक्षवेधी कामगिरी केली आहे. रिलीजनंतरच्या सहा दिवसांत चित्रपटाने २५ कोटी १५ लाखांची कमाई केली आहे. म्हणजेच चित्रपटाची लागत वसूल झाली आहे आणि ‘अंधाधुन’ हिटच्या रांगेत विराजमान झाला आहे.
#AndhaDhun is SUPER STRONG... Continues to collect more on weekdays [vis-à-vis Day 1]... Look at the biz on Mon, Tue and Wed - it’s FANTASTIC... Fri 2.70 cr, Sat 5.10 cr, Sun 7.20 cr, Mon 3.40 cr, Tue 3.50 cr, Wed 3.25 cr. Total: ₹ 25.15 cr. India biz. 👍👍👍
— taran adarsh (@taran_adarsh) October 11, 2018
गत शुक्रवारी ‘अंधाधुन’ रिलीज झाला त्यावेळी सलमान खान प्रॉडक्शनच्या ‘लवयात्री’ आणि हॉलिवूडच्या ‘वेनम’ या चित्रपटासोबत या चित्रपटाची स्पर्धा होती. पण या दोन्ही चित्रपटांना मागे सारत ‘अंधाधुन’ या मडर मिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकलीत.
रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने २ कोटी ७० लाखांचा बिझनेस केला. शनिवारी हा आकडा ५ कोटी १० लाखांवर पोहोचला. रविवारी ‘अंधाधुन’च्या कमाईत आणखी वाढ झाली आणि चित्रपटाने ७ कोटी २० लाख कमावले. यानंतर सोमवारी ३ कोटी ४० लाख, मंगळवारी ३ कोटी ५० लाख, बुधवारी ३ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला. येत्या वीकेंडमध्ये हा चित्रपट ३० कोटींची कमाई करेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
चित्रपटाला मिळालेल्या या यशानंतर दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि अभिनेता आयुष्यमान खुराणा सक्सेस पार्टीच्या तयारीत असल्याचे कळतेय. ‘बरेली की बर्फी’, ‘शुभ मंगल सावधान’नंतर आलेला ‘अंधाधुन’ हा आयुष्यमानचा तिसरा यशस्वी चित्रपट आहे. याचसोबत आयुष्यमानने यशाची हॅट्रिक केली आहे़ येत्या शुक्रवारी ‘हेलिकॉप्टर ईला’, ‘तुम्बाड’, ‘फ्रायडे’ व ‘जलेबी’ असे चार चित्रपट प्रदर्शित होत आहे. या गर्दीत ‘अंधाधुन’ किती टिकतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.