"यंदा ट्रॉफी आपलीच!" भारताने सेमीफायनल जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 10:23 AM2024-06-28T10:23:35+5:302024-06-28T10:24:33+5:30

भारताने काल सेमीफायनलमध्ये बाजी मारताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करत टीम इंडियाचं कौतुक केलंय (t20 wc)

Bollywood celebrities showered congratulations as india won t 20 wc semifinal against england | "यंदा ट्रॉफी आपलीच!" भारताने सेमीफायनल जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव

"यंदा ट्रॉफी आपलीच!" भारताने सेमीफायनल जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव

भारताने इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलममध्ये बाजी मारत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश मिळवला. भारताने इंग्लंडसमोर १७१ धावांचे तगडं आव्हान उभं केलं होतं. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. पुढे भारतीय गोलंदाजांनीही उत्कृष्ट बॉलिंगच्या जोरावर इंग्लंडला गुडघे टेकायला लावलं. भारताने सेमीफायनल जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलाय. 

अजय देवगणने केलं टीम इंडियाचं कौतुक

अजय देवगण आणि आयुष्मान खुराना या दोघांनी टीम इंडियाचं कौतुक करुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. अजय देवगणने T20 वर्ल्ड कप फायनलसाठी आपला उत्साह दाखवला. अजयने ट्विटरवर लिहिलंय की, "पुनरागमन अर्थात टीम इंडियाचा दमदार कमबॅक दाखवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल आपण दूर आहोत हे दाखवण्याची वेळ आली आहे! Well Played Boys! ट्रॉफी घरी आणण्याची वेळ आली आहे."

आयुष्मान टीम इंडियाबद्दल काय म्हणाला?

'अंधाधून', 'विकी डोनर' फेम अभिनेता आयुष्मान खुरानाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "भारत चांगला खेळला! संपूर्ण टीमची  विशेषत: रोहित, सूर्यकुमार, कुलदीप, अक्षर, बुमराह यांनी सेमी फायनलमध्ये खूप चमकदार आणि प्रभावी कामगिरी केली आहे! तुम्ही ट्रॉफी नक्कीच जिंकून आणाल" याशिवाय वरुण धवन, अभिषेक बच्चन आणि इतरही अनेक कलाकारांनी इंन्स्टाग्राम स्टोरी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून टीम इंडियाचं अभिनंदन केलंय.

Web Title: Bollywood celebrities showered congratulations as india won t 20 wc semifinal against england

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.