बॉलिवूड सेलिब्रेटींची मुलं  शिकतात या शाळांमध्ये, फीजची रक्कम ऐकून तुम्हाला येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 08:00 AM2020-04-01T08:00:00+5:302020-04-01T08:00:00+5:30

बॉलिवूड सेलिब्रेटींची मुलं शिकतात या शाळांमध्ये

Bollywood Celebrity Kids Learn In these schools, you will be shocked to hear the amount of fees TJL | बॉलिवूड सेलिब्रेटींची मुलं  शिकतात या शाळांमध्ये, फीजची रक्कम ऐकून तुम्हाला येईल भोवळ

बॉलिवूड सेलिब्रेटींची मुलं  शिकतात या शाळांमध्ये, फीजची रक्कम ऐकून तुम्हाला येईल भोवळ

googlenewsNext

बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी मुंबईतून शिक्षण घेतले आहे. इतकेच नाही तर त्यांची मुलेदेखील मुंबईतील प्रतिष्ठीत शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. यात शाहरूख खानचा मुलगा अबराम, अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या, माधुरी दीक्षित नेनेची दोन्ही मुले अरिन व रयान, हृतिक रोशनचे दोन्ही मुले व करिश्मा कपूरचे दोन्ही मुलांनी मुंबईतील लोकप्रिय शाळेत शिक्षण घेत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरूख खानचा मुलगा अबराम धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकतो आहे.



अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्यादेखील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकते आहे. २००३ साली नीता अंबानीने ही शाळा सुरू केली होती.



अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव जुहूमधील इकॉले मोंडिआले वर्ल्ड स्कूलमध्ये शिकत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षयची मुलगी नितारादेखील याच शाळेत शिकत आहे.



माधुरी दीक्षित नेनेचे दोन्ही मुले अरिन व रयान मुंबईतील ऑबेरॉय इंटरनॅशनल शाळेत शिकत आहेत. ऑबेरॉय इंटरनॅशनल शाळा भारतातील टॉप तीन शाळांपैकी एक आहे.



हृतिक रोशन व सुजैनचे दोन्ही मुले धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या शाळेत बालवाडीपासून सातवी इयत्तेपर्यंतची फी १ लाख ७० हजार इतकी आहे.



करिश्मा कपूरची दोन्ही मुलेदेखील याच शाळेत शिकत आहेत. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार शाळेची अ‍ॅडमिशन फी जवळपास २४ लाख रुपये इतकी आहे.

Web Title: Bollywood Celebrity Kids Learn In these schools, you will be shocked to hear the amount of fees TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.