...म्हणून ‘या’ सेलिब्रिटींचे नाव मतदान यादीतून आहे गायब!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 12:13 PM2019-03-22T12:13:37+5:302019-03-22T12:16:01+5:30

प्रत्येक निवडणुकीत मतदाराने मतदान करावे असा आग्रह धरला जातो, मात्र आपणास कदाचित माहित नसेल की, काही बॉलिवूड सेलब्स आहेत ज्यांना भारतात मतदानाचा अधिकारच नाहीय, अर्थात यांचे नाव वोटिंग लिस्टमध्ये नाही आहे. आज आपण अशाच सेलिब्रिटींबाबत जाणून घेऊया जे मतदानापासून वंचित आहेत.

'This' Bollywood Celebs Dont Have Right To Vote In Lok Sabha Election 2019 | ...म्हणून ‘या’ सेलिब्रिटींचे नाव मतदान यादीतून आहे गायब!

...म्हणून ‘या’ सेलिब्रिटींचे नाव मतदान यादीतून आहे गायब!

googlenewsNext

- रवींद्र मोरे
भारतात पुढील महिन्यापासून १७ व्या लोकसभा निवडणूकीस सुरुवात होणार आहे. ह्या निवडणुका सात टप्प्यात होणार असून ११ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या या निवडणुकीचा शेवटचा टप्पा १९ मे रोजी होईल तर २३ मे रोजी निवडणुकीचे निकाल घोषित होतील. प्रत्येक निवडणुकीत मतदाराने मतदान करावे असा आग्रह धरला जातो, मात्र आपणास कदाचित माहित नसेल की, काही बॉलिवूड सेलब्स आहेत ज्यांना भारतात मतदानाचा अधिकारच नाहीय, अर्थात यांचे नाव वोटिंग लिस्टमध्ये नाही आहे. आज आपण अशाच सेलिब्रिटींबाबत जाणून घेऊया जे मतदानापासून वंचित आहेत.

* दीपिका पादुकोण
या यादीत दीपिका पादुकोणचेही नाव समावेश आहे. दीपिका डेन्मार्कच्या कोपनहेगेनमध्ये जन्मली आहे. जन्माच्या सुमारे एक वर्षानंतर ती भारतात आली होती, मात्र तिच्याजवळ डेन्मार्कचे नागरिकत्व आणि पासपोर्ट आहे. त्यामुळे ती भारतात मतदान करु शकत नाही. तिने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात शाहरुख खानसोबत ‘ओम शांति ओम’ चित्रपटाद्वारा केली होती.


* कॅटरिना कैफ
लोकसभा निवडणुक वोटिंग लिस्टमधून अभिनेत्री कॅटरिना कैफचेही नाव समावेश नाही. तिच्याजवळ ब्रिटिश नागरिकत्व असल्याकारणाने तिला भारतात मतदानाचा अधिकार नाही. कॅटरिनाने २००३ मध्ये ‘बुम’ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.



* जॅकलिन फर्नांडिस
श्रीलंकन ब्यूटी आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा जन्म मनामा (बहरीन) मध्ये झाला होता. त्यामुळे तिच्याजवळ श्रीलंकाचे नागरिकत्व आहे. याच कारणाने ती भारतात मतदान करु शकत नाही. जॅकलिनचे वडिल एक श्रीलंकन तमिळीयन आहेत आणि तिची आई किम मलेशियन आहे.

* नर्गिस फाखरी
बॉलिवूडमध्ये ‘रॉकस्टार’ नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री नर्गिस फाखरीदेखील भारतात राहूनही मतदान करु शकत नाही. तिचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता, त्यामुळे तिचे नागरिकत्व आणि पासपोर्ट अमेरिकी आहे, ज्यामुळे ती भारतात मतदानापासून वंचित आहे.

* सनी लियोनी
बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लियोनीजवळही भारतीय नागरिकत्व नसल्याने ती भारतात राहूनही मतदान करु शकत नाही. तिचे खरे नाव करनजीत कौर वोहरा असून तिचा जन्म सर्नियाा, कॅनडामध्ये एका शिख परिवारात झाला आहे. पॉर्न स्टारची ओळख मिटवत ती बॉलिवूडमध्ये नवी ओळख मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

* आलिया भट्ट
आपणास हे ऐकून धक्का बसेल की, आलिया भट्ट जवळही भारतीय नागरिकत्व नाहीय. हो, तिची आई सोनी राजदान बर्मिंगहॅमची असून तिच्याजवळ ब्रिटिश नागरिकत्व आहे. याच कारणाने आलियाजवळही ब्रिटिश पासपोर्ट आणि नागरिकत्व आहे, ज्यामुळे ती भारतान मतदान करु शकत नाही.



* अक्षय कुमार
बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारजवळ कॅनडाचे नागरिकत्व असून त्याचे पासपोर्टदेखील कॅनडाचेच आहे. विशेष म्हणजे अक्षयला कॅनडाचे नागरिकत्व सन्मानार्थ मिळाले आहे. त्याला कॅनडाची ‘यूनिवर्सिटी आॅफ विंडसर’ द्वारा आॅनरेरी डॉक्टरेट लॉची डिग्री मिळाली असून त्यानंतर त्याला कॅनडाची आॅनरेरी सिटीजनशिपदेखील देण्यात आली, यामुळे अक्षयचे नाव भारतीय वोटिंग लिस्टमध्ये समावेश नाही.

Web Title: 'This' Bollywood Celebs Dont Have Right To Vote In Lok Sabha Election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.