बॉलीवुडची चिकनी चमेली कोट्यवधीची मालकीण असूनही मुंबईत राहते भाड्याच्या घरात,लाखो रुपये देते भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:04 PM2018-07-18T13:04:55+5:302018-07-18T13:11:07+5:30

बडे दिग्दर्शक कतरिनाला सिनेमात घेण्यासाठी उत्सुक असतात. २००३ सालापासून हिंदी चित्रपटसृष्टीत कतरिना नाव कमावतेय. कतरिना तिच्या एका सिनेमासाठी सहा ते सात कोटींच्या घरात मानधन घेते.

Bollywood Chikani chameli Katrina Kaif Stays in Rented house in Mumbai | बॉलीवुडची चिकनी चमेली कोट्यवधीची मालकीण असूनही मुंबईत राहते भाड्याच्या घरात,लाखो रुपये देते भाडे

बॉलीवुडची चिकनी चमेली कोट्यवधीची मालकीण असूनही मुंबईत राहते भाड्याच्या घरात,लाखो रुपये देते भाडे

बॉलीवूडची चिकनी चमेली म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ. घायाळ करणारं सौंदर्य, कुणाच्याही काळजाचा ठाव घेतील अशा मादक अदा आणि अभिनय यामुळे कतरिनानं अल्पावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्रीच्या यादीत तिने स्थान मिळवलं आहे. त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बॅनर्सचे सिनेमा कतरिनाकडे आहेत. बडे दिग्दर्शक कतरिनाला सिनेमात घेण्यासाठी उत्सुक असतात. २००३ सालापासून हिंदी चित्रपटसृष्टीत कतरिना नाव कमावतेय. कतरिना तिच्या एका सिनेमासाठी सहा ते सात कोटींच्या घरात मानधन घेते.

सिनेमांसोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून कतरिना कोट्यवधी रुपये कमावते. एका रिपोर्टनुसार कतरिनाकडे ६४ कोटींची संपत्ती आहे. याशिवाय तिच्याकडे बड्या कंपन्यांच्या महागड्या आलिशान कार आहेत. मात्र आजही भारतात तिचं हक्काचं घर नाही. कतरिना आजही भाड्याच्या घरात राहते. सुरुवातीच्या काळात कॅट वांद्रे इथल्या गुलदेव सागर अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला होती. २०१४ साली ती त्यावेळचा बॉयफ्रेंडरणबीर कपूरसह कार्टर रोडच्या सिल्वर सेंड अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती. मात्र दोघांचं ब्रेकअप झालं. तरीही काही काळ कॅट त्याच घरात राहत होती. या घराचे सुमारे १५ लाख रुपये प्रति महिना भाडे होते. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना वांद्रे इथल्या माऊंट मेरी चर्चजवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली. मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तसंच स्वप्न कोट्यवधीची मालकीण असणाऱ्या कॅटचंही असावं. त्यामुळंच तिने मुंबईत स्वतःचं घर खरेदी केल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र याबाबत कॅटने अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे सध्या तरी कॅट मुंबईत भाड्याच्या घरातच राहते.


बॉलिवूडमध्ये नवखी असताना कॅटरिनाला हिंदी बोलता येत नव्हते. तिचा अभिनयही सुमार होता. हिंदी येत नाही, त्यात अभिनयाची बोंब. त्यामुळे त्याकाळात तिची बरीच खिल्ली उडवली गेली. हिंदीचं नाही तर अभिनयही न येणारी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये टिकणारचं नाही, असे भाकित त्याकाळी अनेकांनी वर्तवले.  तिला बरेच नकार पचवावे लागलेत. अनेकांनी तिच्या अभिनयावर टीका केली तर अनेकांनी तिला नाचता येत नाही म्हणून, नाकं मुरडली. तिच्या हिंदीबद्दलही लोक नाही नाही ते बोललेतं. पण कॅटरिना जिगरबाज निघाली. तिने ही सगळी टीका पचवत, स्वत:ची अशी काही ओळख निर्माण केली की, लोकांची तोंड बंद झालीत. 

Web Title: Bollywood Chikani chameli Katrina Kaif Stays in Rented house in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.