कोरिओग्राफर रेमो डिसुझाला जीवे मारण्याची धमकी? पत्नी लिझेलने केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:29 IST2025-01-24T13:24:22+5:302025-01-24T13:29:42+5:30

बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

bollywood choreographer remo dsouza wife lizelle reaction on death threat says | कोरिओग्राफर रेमो डिसुझाला जीवे मारण्याची धमकी? पत्नी लिझेलने केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

कोरिओग्राफर रेमो डिसुझाला जीवे मारण्याची धमकी? पत्नी लिझेलने केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

Remo dsouza Wife Reaction:  बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. अभिनेता सैफ अली खानवर झालेला जीवघेण्या हल्ल्याचे प्रकरण ताजे असताना त्यानंतर आता एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. अभिनेता राजपाल यादव(Rajpal Yadav), कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) सुगंधा मिश्रा आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा (Remo dsouza) या सेलिब्रिटींना या मेलद्वारे कलाकारांनी जी वेमारण्याची धमकी देण्यात आली.  या कलाकारांनी या संदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवाय यामुळे आता बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या प्रकरणावर कोरिओग्राफर रेमो डिसुझाची पत्नी लिझेलने भाष्य केलं आहे. 

कोरिओग्राफर रेमो डिसूजाची पत्नी लिजेल डिसुझा मीडियासोबत बातचीत करताना म्हणाली, "असं काहीही घडलेलं नाही. आम्ही सुद्धा सोशल मीडियावर याबद्दल वाचलं. आम्हाला कंपनीच्या मेल आयडीवर एका वेगळ्याच काही स्पॅम ई-मेल आले. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. सायबर पोलीस याबद्दल तपास करत असून हा एक स्पॅम आहे, असं त्यांचं देखील म्हणणं आहे."

पुढे लिझेलने सांगितलं, "यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही. जर काही संशयास्पद असेल तर पोलीस तपास करतच आहेत.मला वाटलं नव्हतं की या सगळ्या प्रकरणाचा वेगळाच अर्थ काढण्यात येईल. मीडियाने याचा चुकीचा अर्थ काढला. हे खरं आहे की काही स्पॅम ई-मेल आम्हाला आले, परंतु लोकं काही वेगळंच समजत आहेत. असे मेल्स फक्त आम्हालाच नाही तर अजून बऱ्याच लोकांना आले आहेत." असा खुलासा तिने केला. 

रेमो डिसुझा हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. 'डान्स इंडिया डान्स' या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत त्याने अनेक डान्सर घडवले. या शोने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली. त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांना कोरिओग्राफ केलं आहे. 

Web Title: bollywood choreographer remo dsouza wife lizelle reaction on death threat says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.