४ वर्षांच्या डेटिंगनंतर बॉलिवूड कपलची लगीनघाई! मार्चमध्ये अडकणार लग्नाच्या बेडीत? पोस्टमुळे रंगल्या चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 13:25 IST2024-02-15T13:25:45+5:302024-02-15T13:25:56+5:30
गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी जोडीदाराबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आता बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल लवकरच बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे.

४ वर्षांच्या डेटिंगनंतर बॉलिवूड कपलची लगीनघाई! मार्चमध्ये अडकणार लग्नाच्या बेडीत? पोस्टमुळे रंगल्या चर्चा
सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी जोडीदाराबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आता बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल लवकरच बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राटची आणि अभिनेत्री कृती खरबंदा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मार्च महिन्यात दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
पुलकित आणि कृतीने नुकताच व्हॅलेंटाइन डे साजरा केला. याचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत कृतीने लग्न करणार असल्याची हिंट पोस्टमधून दिली आहे. "हातात हात घालून, Let’s March together", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. कृतीच्या या पोस्टमुळे त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. मार्च महिन्यात पुलकित आणि कृती लग्न करणार आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
पुलकित आणि कृती गेल्या ४-५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. तर अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटोही शेअर करताना दिसतात. 'पागलपंती' या सिनेमात कृती आणि पुलकित एकत्र दिसले होते. तेव्हापासून त्यांनी डेट करायला सुरुवात केली होती. 'तैश' आणि 'वीरे दी वेडिंग' या सिनेमातही त्यांनी एकत्र काम केलं आहे.