​विश्वसुंदरींचे बॉलिवूड पदार्पण : कोणी हिट तर कोणी फ्लॉप !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 12:43 PM2017-12-02T12:43:44+5:302017-12-02T18:13:44+5:30

-रवींद्र मोरे  मिस वर्ल्ड २०१७ चा किताब मिळविणारी मानुषी छिल्लरला सध्या अभिनेत्री बनण्यात काहीही घाई नाही. भारतात परत आल्यानंतर ...

Bollywood debut: Who hit someone if hit? | ​विश्वसुंदरींचे बॉलिवूड पदार्पण : कोणी हिट तर कोणी फ्लॉप !

​विश्वसुंदरींचे बॉलिवूड पदार्पण : कोणी हिट तर कोणी फ्लॉप !

googlenewsNext
ong>-रवींद्र मोरे 
मिस वर्ल्ड २०१७ चा किताब मिळविणारी मानुषी छिल्लरला सध्या अभिनेत्री बनण्यात काहीही घाई नाही. भारतात परत आल्यानंतर सर्वप्रथम बॉलिवूडमध्ये पदार्पणाबाबत विचारले असता तिने स्पष्ट नकार दिला. मात्र या अगोदरही काही विश्व सुंदरी होऊन गेल्या आहेत. त्यांनी मात्र बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. मात्र त्यापैकी काही हिट तर काही फ्लॉप झालेत. जाणून घेऊया त्यांच्याबाबत...! 



* मानुषी सध्या नाही येणार चित्रपटात
चीनच्या सान्यामध्ये मिस वर्ल्ड किताब जिंकणारी मानुषी छिल्लर नुकतीच भारतात परत आली. त्यानंतर मुंबईत पहिल्यांदा मीडियाच्या समोर आली आणि म्हटली की, ‘मी व्यवसायाने डॉक्टर आहे, तर याच सेवेला पुढे नेऊ इच्छिते.’ मानुषीच्या मते, ती सध्या चित्रपटात येण्याचा तिचा मानस नाही आहे. मानुषी पुढे म्हटली की, ‘येणाऱ्या काळात मी चार महाद्विपांची यात्रा करणार आहे. या दरम्यान आम्हाला महिलांच्या मासिक पाळी संदर्भात येणाऱ्या समस्यांवर जनजागृती करायची आहे.’ चित्रपटाबाबत तिला विचारले असता, अजून याबाबत काहीही बोलू शकत नाही, असे ती म्हटली.   

Related image

* ऐश्वर्या राय बच्चन (१९९४)
भारताची पहिली मिस वर्ल्ड रीता फारियाने कधही चित्रपटात काम केले नाही. मात्र १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब मिळविणारी ऐश्वर्या राय बच्चनने तीन वर्षाच्या कालांतराने १९९७ मध्ये अभिनयाला सुरुवात केली. तिचा पहिला चित्रपट ‘इरूवर’ जो तमिळ होता. याच वर्षी तिने ‘और प्यार हो गया’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला. ऐश्वर्याला खरी ओळख मिळाली ती 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातून जो १९९९ मध्ये रिलीज झाला होता. यातील तिच्या अभिनयाची खूपच प्रशंसा झाली होती. या चित्रपटासाठी तिला फिल्म फेयर बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अ‍ॅवार्डदेखील मिळाला होता. त्यानंतर ‘देवदास’, ‘मोहब्बते’, ‘धूम२’ यासारख्या मोठ्या चित्रपटातही ऐश्वर्याने काम केले. २००७ मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनसोबत तिने लग्न केले, आता दोघांना एक मुलगीही आहे. ऐश्वर्याचा शेवटचा चित्रपट 'ए दिल है मुश्किल' होता. 



* डायना हेडन (१९९७)

१९९७ मध्ये मिस वर्ल्ड बनलेली डायना हेडनदेखील बॉलिवूडमध्ये आली मात्र तिला ऐश्वर्या सारखे यश मिळाले नाही. मिस वर्ल्ड बनल्यानंतर लगेचच यूके चालली गेली होती, जिथे तिने अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन घेतले होते. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या नावे एखादाच चित्रपट आहे, ज्यात २००३ मधील आलेला ‘तहजीब’चे नाव सांगता येईल. याशिवाय डायना बऱ्याच रिअ‍ॅलिटी शोमध्येही दिसली होती. त्यानंतर डायनाने तिचा बॉयफे्रं ड कोलिन डिकसोबत लग्न केले. आता ती चित्रपटांपासून खूप लांब आहे.   



* युक्ता मुखी (१९९९)
सन १९९९ मध्ये भारताची युक्ता मुखीने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने चित्रपटात काम करणे सुरु केले. तिचा पहिला चित्रपट 'पुवेलम उन वसम' हा तमिळ चित्रपट होता. यात युक्ताने एक आयटम डान्स केला होता. त्यांनतर २००२ मध्ये तिने ‘प्यासा’ या चित्रपटात बॉलिवूड डेब्यू केला होता. मात्र ६ ते ७ वर्षाच्या कारकिर्दीत तिने बॉलिवूडमध्ये आपली ओळख केली नाही आणि २००८ नंतर ती पडद्यावर दिसलीच नाही.  



* प्रियांका चोप्रा (२०००)
सन २००० मध्ये मिस वर्ल्ड बनण्याच्या दोन वर्षानंतर प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा पहिला चित्रपट ‘हमराज’ होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची खूपच प्रशंसा झाली होती. याच कारणाने २००३ मध्ये आलेला ‘द हीरो’ या चित्रपटात तिला घेण्यात आले. त्यानंतर 'अंदाज', 'प्लान', 'किस्मत' आणि 'मुझसे शादी करोगी' हे चित्रपट तिचे हिट ठरले. बॉलिवूडपासून सुरुवात करणारी प्रियांका हॉलिवूडपर्यंत पोहचली आहे.   

Web Title: Bollywood debut: Who hit someone if hit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.