एकटेपणावर करण जोहरने व्यक्त केल्या भावना, पालकत्वाविषयीही शेअर केला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 04:49 PM2023-12-11T16:49:38+5:302023-12-11T16:50:51+5:30
करण म्हणाला, 'मला एकटेपणाने घेरलं आहे.'
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरचा (Karan Johar) लोकप्रिय शो 'कॉफी विद करण सिझन 8' ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. यावेळी शोमध्ये करण जोहरने सेक्स लाईफविषयावर चर्चा न करणंच पसंत केलंय. कारण याआधी करणला या गोष्टीवरुन बऱ्याचदा ट्रोल करण्यात आलं आहे. नुकतंच करणने एका एपिसोडमध्ये एकटेपणावर भाष्य केलं.
'कॉफी विद करण सिझन 8' च्या 7 व्या एपिसोडमध्ये हजेरी लावली. एपिसोडमध्ये करण बॉलिवूडमधील नवविवाहित जोड्यांविषयी बोलत होता. तुम्हा सर्वांना आपला जोडीदार मिळाला, तुम्ही इतकं थाटात लग्न केलं हे पाहून छान वाटतं असं तो म्हणाला. याचवेळी त्याने स्वत:च्या एकाकी आयुष्याबद्दलही खंत व्यक्त केली. तो म्हणाला, 'आपण आपल्या दुबळेपणाचा सतत बचाव करत असतो. पण एक वेळ अशी येते जेव्हा आपण मोठे होतो. आपण समजुतदार होतो आणि आपल्याला जाणवतं की आयुष्याचा एका टप्प्याची सुरुवात करणं जितकं अवघड वाटतं तितकं ते आता वाटत नाही. मी 43 व्या वर्षी एक पुस्तक लिहिलं. मी जितकं शेअर करु शकत होतो त्याच्या ८० टक्के सांगितलं. २० टक्के आपण नेहमी दाबून ठेवतो. कारण हा आपला विषेष अधिकार आहे. शोच्या वेळेसचा तो क्षण खरा होता आणि ते खरंच आहे.'
करण जोहरने पालकत्वावरही चर्चा केली. तो म्हणाला, 'मला एकटेपणाने घेरलं आहे. मी आणि माझी आई मुलांचं संगोपन करत आहोत. मला कोणीही पार्टनर नाही. मी सिंगल आहे. मी दिवसभर इतका कामात व्यस्त राहतो की स्वत:ला एकटेपणा जाणवू देत नाही. प्रत्येक एकटा माणूस कदाचित हेच करत असेल.'
वर्कफ्रंट
करण जोहर तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शनात परतला आहे. त्याचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा हिट ठरला. सध्या करण आगामी सिनेमांच्या तयारित व्यस्त आहे. सिद्धार्थ मल्होत्राला घेऊन तो 'योद्धा' सिनेमा आणत आहे.