अजय देवगणला आलेली हृतिक रोशनच्या ‘क्रिश-३’ चित्रपटाची ऑफर; 'या' कारणामुळे अभिनेत्याने दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 18:54 IST2024-11-21T18:51:20+5:302024-11-21T18:54:57+5:30
राकेश रोशन दिग्दर्शित आणि निर्मित ‘क्रिश-३’ (krrish-3) या चित्रपटातील अॅक्शन सीन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.

अजय देवगणला आलेली हृतिक रोशनच्या ‘क्रिश-३’ चित्रपटाची ऑफर; 'या' कारणामुळे अभिनेत्याने दिला नकार
Krrish-3: राकेश रोशन दिग्दर्शित आणि निर्मित ‘क्रिश-३’ (krrish-3) या चित्रपटातील अॅक्शन सीन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, कंगना राणौत, विवेक ओबेरॉय आणि शरयू चौहान हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले. १ नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी ‘क्रिश-३’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. चित्रपटामध्ये अभिनेत्री कंगना राणौत आणि विवेक ओबेरॉय यांनी खलनायिकी भूमिका साकारली होती. विवेक ओबेरॉने चित्रपटात 'काळ'ची व्यक्तिकेखा उत्तमरित्या रंगवली. पण,‘क्रिश-३’ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी विवेक ओबेरॉयला नाही तर अजय देवगणला विचारणा करण्यात आली होती. परंतु काही कारणांमुळे अभिनेत्याने राकेश रोशन यांची ऑफर नाकारली. यामागे नेमकं काय कारण होतं? जाणून घेऊया.
'न्यूज 18'ला दिलेल्या मुलाखतीत राकेश रोशन यांनी याबद्दल खुलासा केला. त्यादरम्यान राकेश रोशन म्हणाले, "मला अजय देवगणसोबत काम करण्याची इच्छा होती पण ते काही शक्य झालं नाही. तो एक उत्तम अभिनेता आहे. शिवाय प्रत्येक चित्रपटातून तो आपल्या अभिनयाचा ठसा चाहत्यांच्या मनावर उमटवतो."
पुढे राकेश रोशन यांनी सांगितंल की, "क्रिश-३ साठी मी अजय देवगणला संपर्क केला होता. त्याला चित्रपटाचं कथानक खूप आवडलं होतं. पण, अजयने ही ऑफर नाकारली. त्यावेळी तो मला म्हणाला, राकेशजी माझ्यासाठी हे करणं थोडं अवघड आहे. कारण मी कायमच हिरो म्हणून प्रेक्षकांच्या समोर आलो आहे. त्यामुळे चित्रपटात शेवटी मला कोणी मारेल, हे चांगलं वाटणार नाही आणि तुम्ही या स्टोरीमध्ये काही बदल करणार नाही. असं म्हणत त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला." असा खुलासा राकेश रोशन यांनी केला.