तब्बल २० वर्षानंतर 'ऐतराज' चित्रपटाचा सीक्वल येणार; सुभाष घई यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:37 PM2024-11-13T16:37:37+5:302024-11-13T16:40:11+5:30

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक सुभाष घई यांनी 'ऐतराज' चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली आहे.

bollywood director subhash ghai confirmed aitraaz movie sequel shared post on social media | तब्बल २० वर्षानंतर 'ऐतराज' चित्रपटाचा सीक्वल येणार; सुभाष घई यांची मोठी घोषणा

तब्बल २० वर्षानंतर 'ऐतराज' चित्रपटाचा सीक्वल येणार; सुभाष घई यांची मोठी घोषणा

Aitraaz Movie Sequel: २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ऐतराज' या चित्रपटात अक्षय कुमार(Akshay Kumar), करिना कपूरदेखील (kareena kapoor) मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. चित्रपटाचं कथानक, उत्तम संवाद आणि प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) रंगवलेली खलनायिका यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई (Subhash Ghai) यांनी सिनेरसिकांना आनंदाची बातमी दिली आहे. ‘ऐतराज’च्या सिक्वलची अधिकृत घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 


नुकताच सोशल मीडियावर सुभाष घई यांनी प्रियांका चोप्राचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलंय, "बोल्ड आणि ब्यूटीफुल प्रियांकाने करून दाखवलं. त्यामुळे तिचे चाहते 'ऐतराज' प्रदर्शित होऊन २० वर्ष झाल्यानंतरही तिचा परफॉर्मन्स विसरू शकले नाहीत. 'ऐतराज' चित्रपटाची निर्मिती मुक्ता आर्ट्सद्वारे करण्यात आली होती. त्यावेळी प्रियांका ही भूमिका करताना खूप घाबरली होती पण तिने पूर्ण आत्मविश्वासाने ती भूमिका उत्तमरित्या वठवली". 

पुढे सुभाष घई यांनी लिहलंय, "आता मुक्ता आर्ट्स ऐतराज-२ च्या सीक्वलसाठी तयार आहे. ३ वर्षांच्या प्रचंड मेहनतीनंतर चित्रपटाची स्क्रीप्ट तयार करण्यात आली आहे". अशी माहिती त्यांनी पोस्टद्वारे चाहत्यांना दिली आहे. 

माहितीनुसार, 'ऐतराज -२' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अमित राय यांच्या खांद्यावर असेल. अमित राय यांनी बहुचर्चित 'ओह माय गॉड' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान, चित्रपटात अक्ष कुमार, प्रियांका चोप्रा तसेच करीना कपूर असणार की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Web Title: bollywood director subhash ghai confirmed aitraaz movie sequel shared post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.