Bollywood Drugs Connection : अर्जुन रामपाल आफ्रिकेला जाणार होता पळून, एनसीबीला होता संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 06:44 PM2021-04-01T18:44:03+5:302021-04-01T18:44:38+5:30
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन रामपाल याच्याकडे एनसीबी तपास करत होती. नुकतीच त्याच्याविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन रामपाल याच्याकडे एनसीबी तपास करत होती. नुकतीच त्याच्याविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, अर्जुन रामपाल हा आफ्रिकेला पळून जाणार होता असे एनसीबाकडून सांगण्यात आले आहे.
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी त्याच्या घरातून एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांना औषधाच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. आता एनसीबीने एक चार्जशीट फाईल केली आहे. त्यात अर्जुनला ड्रग्ज प्रकरणात संशयित असे मानले गेले आहे. हा खुलासा एका चार्जशीटमधून करण्यात आला आहे. दुसरे म्हणजे त्या चार्जशीटनुसार एनसीबीने रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रीकेच्या काऊंसलेट जनरला फोन करुन सदर प्रकरणाची माहिती दिली आहे.
याप्रकरणी एनसीबीने ३ डिसेंबर, २०२० ला रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रीकेच्या काऊंसलेट जनरला पत्र लिहिले होते. ज्यात त्यात त्यांनी म्हटले आहे, की एनसीबीने या प्रकरणाचा सखोल तपास केला आहे. त्यात बॉलिवूडमधील अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच प्रकरणात अर्जुन रामपालकडे संशयित म्हणून पाहिले जात आहे. आम्हाला असा संशय आहे की, तो आफ्रिकेत पळून जाण्याची शक्यता आहे. तसेच या पत्रात म्हटले आहे की अर्जुन रामपालच्या पत्नीचा भाऊ अगिसीआलोस डिमेट्रिएडसला यापूर्वी दोन प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अगिसीआलोस हा साऊथ आफ्रिकन नागरिक आहे. एनसीबीने साऊथ आफ्रिकन काऊंसलेटला असे सांगितले आहे की, जर अर्जुन रामपालने तुमच्याकडे व्हिसासाठी अॅप्लिकेशन केले तर त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात यावी. यानंतर एनसीबीने अर्जुन रामपालला एनडीपीएसच्या कायद्यानुसार १४ डिसेंबर रोजी समन्स पाठवले होते आणि १६ डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल (NCB)ने विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दोषारोपपत्रात ३३ आरोपींची नावे नमूद करण्यात आली. त्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. एनसीबीचे मुख्य समीर वानखेडे यांनी स्वतः विशेष न्यायालयात ११,७०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले. जप्त केलेले ड्रग्स आणि आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती आहे. तसेच २०० साक्षीदारांची नावेही आहेत. एकूण ३३ आरोपींपैकी अद्याप आठ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर रिया आणि शोविक जामिनावर सुटले आहेत. अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींबाबत तपास सुरू आहे, असे एनसीबीने सांगितले.