बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूरच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर 'हा' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 06:06 PM2023-09-29T18:06:08+5:302023-09-29T18:07:05+5:30

सोनम कपूरच्या मोबाईलच्या वॉल पेपपरवर आनंद अहुजा आणि वायूचा फोटो आहे. 

Bollywood fashionista Sonam Kapoor's mobile wallpaper photo | बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूरच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर 'हा' फोटो

Sonam Kapoor

googlenewsNext

फॅशनिस्टा सोनम कपूरबॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळं नेहमीच चर्चेत असते. तिच्या खासगी आयुष्यात अनेक घडामोडी घडत असतात.  सोनम कपूर आणि उद्याजक आनंद अहुजा यांचं २०१८ साली लग्न झालं होतं. त्या दोघांना पुत्ररत्न झालं. त्यांचा मुलगा वायू  हा नुकताच एक वर्षाचा झाला आहे. सोनमचं वायू आणि आनंद अहुजा यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. तुम्हाला माहीत आहे का, सोनम कपूरच्या मोबाईलच्या वॉल पेपपरवर आनंद अहुजा आणि वायूचा फोटो आहे. 

koimoi या वेबसाईटने आलियाचे काही फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या मोबाईलचा वॉल पेपर दिसतोय. वॉलपेपरवर वायू आणि आनंद अहुजा यांचा फोटो दिसत आहे. सोनमचं पती आनंद आहुजासोबत खूप छान बॉन्डींग आहे. कामातून वेळ काढून ते एकत्र वेळ घालवतात. आनंद आहुजा मोठा बिझमेसमन आहे. त्याची नेट वर्थ बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींपेक्षा जास्त आहे. 

सोनम कपूरने अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.  तिने 2007 मध्ये रणबीर कपूरसोबत संजय लीला भन्साळीच्या सावरिया या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.  'रांझना', 'नीरजा', 'प्रेम रतन धन पायो' आणि इतर चित्रपटातून आपला ठसा उमटवला आहे.

आता ती 'बॅटल फॉर बिटोरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाचे काम सुरू होणार आहे. हा चित्रपट अनुजा चौहानच्या कादंबरीवर आधारित आहे. 2010 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात एका अॅनिमेशन तज्ज्ञाची कथा सांगितली आहे. जो बिटोरातील एका माजी राजघराण्याविरुद्ध निवडणूक लढवतो.

Web Title: Bollywood fashionista Sonam Kapoor's mobile wallpaper photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.