'या' चित्रपटातही दिसला श्रीलंकेच्या बॉम्बस्फोटासारखा धमाका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 02:04 PM2019-04-23T14:04:23+5:302019-04-23T14:06:39+5:30
श्रीकंलेच्या अगोदरही भारतासह बऱ्याच देशात असे हल्ले झाले आहेत. या हल्लयानंतर समाज, संघटना आणि एका व्यक्तीच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, याचे चित्रण बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसले आहे. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यांत अशाच प्रकारचे बॉम्बस्फोट आणि त्यानंतरचे नुकसान दाखविण्यात आले आहे.
-रवींद्र मोरे
गेल्या रविवारी श्रीलंकामध्ये सुमारे आठ बॉम्बस्फोट झाले. अतिशय ह्रदयद्रावक घटना श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये घडली. या घटनेने सर्वजगभरात रोष व्यक्त केला जात आहे. श्रीकंलेच्या अगोदरही भारतासह बऱ्याच देशात असे हल्ले झाले आहेत. या हल्लयानंतर समाज, संघटना आणि एका व्यक्तीच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, याचे चित्रण बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसले आहे. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यांत अशाच प्रकारचे बॉम्बस्फोट आणि त्यानंतरचे नुकसान दाखविण्यात आले आहे.
* ब्लॅक फ्रायडे
हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले होते. हा चित्रपट मुंबईमध्ये झालेल्या १९९३ च्या बॉम्बस्फोटावर आधारित होता. या स्फोटाने मुंबई कशी हादरली होती, याने जनजीवन कसे विस्कळीत झाले आणि किती व कसे नुकसान झाले हे या चित्रपटात दर्शविण्यात आले होते. हा चित्रपट पाहून प्रेक्षक खूपच भावूक होऊन हल्लेखोरांप्रती संतापही व्यक्त केला होता. या चित्रपटास उत्कृष्ट सादरीकरणामुळे बरेच पुरस्कारही मिळाले होते.
* मुंबई मेरी जान
इरफान खान, आर माधवन, सोहा अली खान, परेश रावल आणि केके मेनन स्टारर हा चित्रपट २००८ मध्ये रिलीज झाला होता. यात २००६ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईकरांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला होता, याचे सादरीकरण करण्यात आले होते. विशेषत: यात पाच लोकांच्या आयुष्याच्या पाच वेगवेगळ्या कथा दाखविण्यात आल्या आहेत. याचे दिग्दर्शन निशिकांत कामतने केले होते.
* कुर्बान
सैफ अली खान आणि करिना कपूर स्टारर हा चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला होता. याचे दिग्दर्शन रेंसिल डिसिल्वाने केले होते. हा चित्रपट अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या हल्लयाशी प्रेरित असून यात त्यानंतरची परिस्थिती दाखविण्यात आली आहे. शिवाय सैफ आणि करिना यांच्या लव्हस्टोरीवरही काय परिणाम होतो, याचे उत्कृष्ट सादरीकरण दर्शविले आहे.
* द अटॅक 26/11
२०१३ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या हल्लयाशी प्रेरित होता. द अटॅक 26/11 चे दिग्दर्शन राम गोपाल वर्माने केले होते. यात नाना पाटेकरने मुख्य भूमिका साकारली होती. ताजवर हल्ला करणारे १० अतिरेकी आणि त्यांनी सुमारे अडीच दिवस मुंबईवर मिळवलेला ताबा आणि त्यांना प्रत्युत्तर देणारे एनएसडी कमांडो यांच्यातील भयावह दृष्य या चित्रपटात दाखविण्यात आले होते.
* हॉलीडे
अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हाचा हा चित्रपट २०१४ मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉम्बस्फोट आणि दहशतवादी सारख्या विषयावर आधारित असून या चित्रपटास दर्शकांनी खूपच पसंत केले होते. अक्षय कुमार यात एक सैनिक असून तो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कधीही आणि कोणत्याही प्रसंगी कसा सज्ज असतो यांचे उत्कृष्ट सादरीकरण यात दाखविण्यात आले आहे.