करिअरसाठी लपवलं होतं लग्न, लपूनछपून पत्नीला लंडनला भेटायला जायचा अभिनेता; कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 03:00 PM2024-04-09T15:00:19+5:302024-04-09T15:02:27+5:30
हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी या बॉलिवूड अभिनेत्याने गुपचुप लग्न केल्याचं सांगण्यात येतं. आपल्या करिअरसाठी अभिनेत्याने त्याच्या लग्नाची गोष्ट बराच काळ लपवून ठेवली होती.
Sunny Deol love life : 'गदर' फेम बॉलिवूड अभिनेता सनी देओलचे जगभर चाहते आहेत. सनी देओल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. त्याच्या 'गदर- २' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. शिवाय अभिनेत्याच्या मुलाच्या लग्नाच्या चर्चा देखील सर्वत्र रंगल्या. त्याच दरम्यान सनी देओलची पत्नी पूजा देओलचे फोटो प्रचंड व्हायरल झाले.
पूजा देओल यांच्या व्हायरल फोटोंना नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली. सनीची पत्नी लाईमलाईटपासून कायमच दूर असते. मुलगा करण देओलच्या लग्नसमारंभातील फोटोंमुळे पूजा देओल समोर आल्या आणि सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल चर्चा रंगू लागल्या.
मीडिया रिपोर्टनूसार, अभिनेता सनी देओलने बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याआधी लग्न केलं होतं. १९८३ मध्ये त्याने पत्नी पूजासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर सनीने आपलं लग्नाची बातमी काही काळ गुप्त ठेवली. दरम्यान, त्यावेळी सनी देओलचं नाव अभिनेत्री अमृता सिंहबरोबर जोडण्यात आलं होतं. काही कालावधीनंतर सनी देओलच्या लग्नाचे फोटो एका मॅगजीनमध्ये छापून आले आणि सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सनी देओलच्या लग्नाचा उलगडा झाला.
लग्न लपवण्यामागे काय होतं कारण-
माहितीनूसार, सनीच्या लग्नाच्या बातमीमुळे त्याच्या अभिनय कारकिर्दीवर काही परिणाम होता कामा नये, असं वडील धर्मेंद्र यांना वाटत होतं. त्यामुळे लग्न झाल्यानंतर सनी देओल पत्नी पूजाला गुपचूप लंडनमध्ये जाऊन भेटायचा. अखेर काही काळानंतर त्यांच्या लग्नाबद्दल सर्वाना समजलं.
हे चित्रपट ठरले हिट-
सनी देओलने त्याच्या अभिनय कारकिर्दीत 'मंजिल मंजिल', 'जबरदस्त', 'डकैत',' इंतकाम', 'पापा की दुनिया', 'वर्दी', 'चालबाज', मैं तेरा दुश्मन', 'मजबुर', 'क्रोध', 'घायाळ', 'दामिनी', 'बदनाम', 'गदर', 'इंसानियत', 'घातक', 'अर्जुन पंडित' यांसारखे दमदार चित्रपट दिले.