Urvashi Rautela Rishabh Pant: 'बर्थडे बॉय' रिषभ पंतसाठी उर्वशी रौतेलाचा स्पेशल Flying Kiss Video, तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 12:44 PM2022-10-04T12:44:24+5:302022-10-04T12:45:15+5:30

रिषभ पंतचा आज वाढदिवस आहे

Bollywood hot actress Urvashi Rautela wishes Indian Cricketer Rishabh Pant with Flying Kiss Video watch | Urvashi Rautela Rishabh Pant: 'बर्थडे बॉय' रिषभ पंतसाठी उर्वशी रौतेलाचा स्पेशल Flying Kiss Video, तुम्ही पाहिलात का?

Urvashi Rautela Rishabh Pant: 'बर्थडे बॉय' रिषभ पंतसाठी उर्वशी रौतेलाचा स्पेशल Flying Kiss Video, तुम्ही पाहिलात का?

googlenewsNext

Urvashi Rautela Rishabh Pant, Flying Kiss Video: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत मंगळवारी (४ ऑक्टोबर) २५ वर्षांचा झाला आहे. चाहत्यांसह क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगी हिनेही त्याला रोमँटिक पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. पण या सगळ्यात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही पंतला वेगळ्याच पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे त्याची चर्चा आहे. रिषभ आणि उर्वशी यांच्या काही दिवसांपासून वाद पाहायला मिळाला होता. पण आता सगळी भांडणे आणि वादविवाद विसरून उर्वशीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. साहजिकच तो व्हिडीओ लगेच व्हायरल झाला. उर्वशीच्या या पोस्टवर युजर्सनी धमाल कमेंट्स केल्या.

उर्वशीने पोस्टमध्ये फक्त इतकेच लिहिले आहे की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा.' उर्वशीने तिच्या पोस्टमध्ये कुठेही रिषभ पंतच्या नावाचा उल्लेख केलेला नसला तरी उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्यात अलीकडच्या काही दिवसांत जे काही घडले ते पाहता ही पोस्ट केवळ पंतसाठीच केली गेली असावी असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. युजर्सनी कमेंटमध्येही याचा उल्लेखही केलेला आहे. व्हिडिओमध्ये उर्वशी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ती कोणाची तरी वाट पाहत असल्याचे हावभाव चेहऱ्यावर आहेत. मध्येच ती वाढदिवसाची भेट म्हणून एक 'फ्लाइंग किस' देतानाही दिसत आहे. पाहा व्हिडीओ-

युजर्सनी उर्वशीच्या पोस्टवर धमाल कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने उर्वशीच्या पोस्टवर कमेंट केली आहे की, 'वहिनी रिषभ भैय्याचा बर्थडे ना...' तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, 'हॅपी बर्थडे मिस्टर RP17. समजलं का? येथे आरपी म्हणजे रिषभ पंत असं युजर सांगतोय. अलीकडेच उर्वशीची एक मुलाखत व्हायरल झाली होती, ज्यामध्ये तिने 'मिस्टर आरपी'चा संदर्भ देत एक प्रसंगही सांगितला होता. त्यानंतर रिषभ पंत आणि उर्वशी यांच्यात 'सोशल मीडिया वॉर' पाहायला मिळाले होते. मात्र आता जुने हेवे-दावे विसरून उर्वशीला पुन्हा एकदा रिषभ पंतशी मैत्रीचा हात पुढे करायचाय की काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Web Title: Bollywood hot actress Urvashi Rautela wishes Indian Cricketer Rishabh Pant with Flying Kiss Video watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.