Bollywood vs South : बॉलिवूड स्टार्स विकतंय आणि साऊथवाले आपल्या कथा... अनुपम खेर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 10:24 AM2022-08-26T10:24:17+5:302022-08-26T10:29:02+5:30

Bollywood vs South : साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला घाम फोडला आहे. आत्तापर्यंत अनेक दिग्गज यावर बोलले आहेत. आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher ) यांनीही बॉलिवूड विरुद्ध साऊथ या वादावर आपलं मत मांडलं आहे.

Bollywood is selling stars while South is telling stories says Anupam Kher bollywood vs south | Bollywood vs South : बॉलिवूड स्टार्स विकतंय आणि साऊथवाले आपल्या कथा... अनुपम खेर स्पष्टच बोलले

Bollywood vs South : बॉलिवूड स्टार्स विकतंय आणि साऊथवाले आपल्या कथा... अनुपम खेर स्पष्टच बोलले

googlenewsNext

Bollywood vs South : साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला घाम फोडला आहे. बॉलिवूडचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणादण आपटत असताना साऊथच्या सिनेमांना प्रेक्षक गर्दी करत आहेत. साऊथ विरूद्ध बॉलिवूड असा संघर्ष यानिमित्ताने पाहायला मिळतो आहे. आत्तापर्यंत अनेक दिग्गज यावर बोलले आहेत. आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher ) यांनीही बॉलिवूड विरुद्ध साऊथ या वादावर आपलं मत मांडलं आहे. बॉलिवूडचे सिनेमे फ्लॉप होत असताना साऊथचे सिनेमे कोट्यवधी कमवत आहेत. यामागचं कारण काय? यावर अनुपम यांनी भाष्य केलं.

काय म्हणाले अनुपम?

बॉलिवूड आपले स्टार्स विकत आहे आणि साऊथचे लोक त्यांच्या कहाण्या विकत आहेत, मुळात हाच फरक आहे, असं ते म्हणाले.
ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘ साऊथचे लोक आपल्या चित्रपटातील कंटेन्टवर फोकस करतात आणि बॉलिवूड आपल्या स्टार्सवर. ते कथेला महत्त्व देतात आणि आपण आपल्या स्टार्सला. मी दोघांची तुलना करत नाहीये. पण माझ्या मते, त्यांचे सिनेमे प्रासंगिक आहेत. कारण ते हॉलिवूडची कॉपी करत नाहीत. ते कथा सांगत आहेत आणि आपण आपले स्टार्स विकत आहोत. चित्रपट प्रेक्षकांसाठी बनवले जातात आणि ज्याक्षणी आपण ही एक गोष्ट विसरतो, त्यावेळी आपली अधोगती होते. आम्ही एक चांगला सिनेमा बनवून तुमच्यावर उपकार केलेत, असा अविर्भाव असेल तर समस्या निर्माण होणारच.’
अलीकडे अनुपम  ‘लाल सिंग चड्ढा’च्या फ्लॉप शोवरही बोलले होते. आपला चित्रपट फ्लॉप झाला, हे आमिर स्वीकारत का नाही? असं ते म्हणाले होते.

बायकॉट ट्रेंडवरही दिली होती प्रतिक्रिया
अनुपम यांनी अलीकडे ‘बायकॉट ट्रेंड’वरही प्रतिक्रिया दिली होती. बायकॉट ट्रेंडला दोष देण्यात अर्थ नाही. लोकांना तुमचा सिनेमा आवडला नाही, असं स्पष्ट का सांगत नाही? एखादा सिनेमा लोकांना आवडला तर ट्रेंड कुठलाही असो फरक पडत नाही. कोणताही ट्रेंड कोणत्याही सिनेमाला बर्बाद करू शकत नाही. मात्र सिनेमा लोकांना आवडला नसेलच तर तो फ्लॉप होणारच, असं ते म्हणाले होते.

Web Title: Bollywood is selling stars while South is telling stories says Anupam Kher bollywood vs south

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.